लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आत्मदहन आंदोलन तात्पुरते मागे – प्रदिप पाटील चव्हाण जिल्हाध्यक्ष
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी/  दिलेल्या लेखी आश्वासनात नमूद करण्यात आले आहे की आंदोलनातील मागणीतील विषयाचे अनुषंगाने  जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर यांना कळविण्यात आले असून शासनाचे पुढील आदेश आल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल करीता लेखी आश्वासन देऊन तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहेत.शासनाने म्हटल्याप्रमाणे दीपावलीच्या अगोदर गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांची नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे आत्मदहन आंदोलन व शासकीय मका खरेदी केंद्र गंगापुर तालुक्यात चालू करण्याची मागणी चे निवेदन दि. २९/१०/२०२५ देण्यात आले
 
अतिवृष्टी पावसामुळे शेतीच्या पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. शासनाने दीपावली अगोदर शेतकन्यांच्या खात्यात सरसकट अनुदान देण्याचे घोषित केले होते परंतु खात्यात काही अनुदान शासनाने जमा केले नाही, शेतक-यांची दिवाळी ही अंधारातच झाली, शासनाला शेतकऱ्यांचे काही गांभीर्य वाटतच नाही शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे शासकीय मका खरेदी केंद्र त्वरित चालू करा कापूस खरेदी केंद्र त्वरित चालू करा शासकीय भावाने मका खरेदी झाली पाहिजे या सर्व समस्या शासनाने त्वरित सोडल्या पाहिजे या शासनाला जाग येण्यासाठी तसेच गंगापुर तालुक्यातील शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी  दिनांक २९/१०/२०२५ रोजी तहसीलदार यांच्या केबिनमध्ये जाऊन सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने शेतकरी हितासाठी आंदोलन केले.लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आत्मदहन आंदोलन तात्पुरते मागे या आंदोलनात प्रदिप पाटील चव्हाण जिल्हाध्यक्ष संघर्ष असंघटीत बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य , यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,