Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादआश्रम शाळा घाणेगाव तांडा येथे शिक्षक दिनी विद्यार्थी स्वयंशासन

आश्रम शाळा घाणेगाव तांडा येथे शिक्षक दिनी विद्यार्थी स्वयंशासन

आश्रम शाळा घाणेगाव तांडा येथे शिक्षक दिनी विद्यार्थी स्वयंशासन
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/  भारतरत्न माजी राष्ट्रपती व शिक्षण तज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आश्रम शाळा घाणेगाव तांडा ता. सोयगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक वर्गशिक्षक लिपिक शिपाई यांच्या भूमिका सकारात शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळले. त्यात मुख्याध्यापक – अजय संतोष चव्हाण, लिपिक – रोहित राजमल जाधव, शिपाई – दर्शन नामदेव चव्हाण , पृथ्वीराज देविदास जाधव, गौतम गब्बरसिंग चव्हाण
शिक्षक – रीया रमेश चव्हाण,साक्षी अनिल राठोड,पल्लवी बाबुराव राठोड,सुप्रिया विजय जाधव,अश्विनी विजय जाधव,रोशनी ताराचंद पवार,जागृती प्रकाश चव्हाण,नंदिनी योगीराज चव्हाण,रोशनी भिकराज चव्हाण,अंजली विशाल चव्हाण, युवराज नामदेव राठोड, रामेश्वर ज्ञानेश्वर चव्हाण,आनंद अर्जुन राठोड, नमन आत्माराम राठोड, गोरखनाथ जगन्नाथ चव्हाण या विद्यार्थ्यांनी वर्गात अध्यापन केले.
कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिकचे मुख्याध्यापक संजय पाटील व प्राथमिकचे मुख्याध्यापक दिवाकर लवांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. मनोज पाटील, सुनील कवीश्वर, देवचंद बागुल, सलीम तडवी, यांनी मनोगत व्यक्त केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments