Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादउस्मानाबादअर्धामसला मशीद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींवर दहशतवादी कायद्यांतर्गत कार्यवाही करावी

अर्धामसला मशीद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींवर दहशतवादी कायद्यांतर्गत कार्यवाही करावी

अर्धामसला मशीद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींवर दहशतवादी कायद्यांतर्गत कार्यवाही करावी
उस्मानिया फाउंडेशनची मागणी.
माजलगाव /प्रतिनिधी /शेख हमीद/ गेवराई तालुक्यातील अर्धमसला  येथील मक्का मस्जिद मध्ये झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करुन संबंधित आरोपींवर दहशतवाद विरोधी कायदा (UAPA Act.१९६७) व राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA Act.) अंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी
उस्मानिया फाउंडेशन माजलगाव संघटनेच्या वतीने आ. प्रकाश सोळंके यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
दि.३० मार्च २०२५ रोजी अर्धामसला ता. गेवराई जि.बीड येथील मक्का मस्जिद मध्ये स्फोट घडविणारे आरोपींनी मुस्लिम समाजाच्या पवित्र मस्जिद मध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याच्या उद्देशाने देशात दहशतवाद पसरविण्यासाठी पवित्र मस्जिद मध्ये स्फोट घडविलेला आहे,व त्यामुळे पवित्र मस्जिदचे नुकसान झाले असुन पवित्र मस्जिदेची विटंबना झाली आहे.या बाबत अटक आरोपींनी पवित्र मस्जिद स्फोट करण्या अगोदर व्हि.डी.ओ.बनवुन सोशियल मिडीयावर टाकलेला आहे.या मागे असलेल्या मास्टरमाईंडला अटक करने देखील गर्जेचे आहे.म्हणुन सर्व संबंधितावर व मास्टरमाईंडवर दहशत विरोधी कायदा (UAPA Act. १९६७) व राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA Act.) अतंर्गत कार्यवाही करुन त्यांच्या विरुद्ध फासस्ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवुन आरोपींना कडक शासन व दंड करण्यात यावे अशी मागणी उस्मानीय फाउंडेशन माजलगावच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.तशा मागणीचे निवेदन माजलगाव मतदार संघाचे आ.प्रकाश सोळंके यांना देण्यात आले आहे आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments