आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अपंगांच्या जीवनावश्यक मागण्या तत्काळ मंजूर करण्यात यावी व अपंगांच्या जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र शासनाने व राज्य साशासानाने वेग वेगळे शासन निर्णय निर्गमित केले आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या व कर्मचार्यांच्या हलगर्जी पणा मुळे त्या योजना अपंगांना मिळत नाही. व अपंग हे प्रत्येक योजने पासून वंचित राहतात. त्या करिता आपणास निवेदन देण्यात आलेले आहे. काय आहे मागण्या १) पंचायत समिती अंतर्गत ५% निधी त्वरित वाटपप्रमुख मागण्या २) अपंगांना विना अट घरकुल मंजूर करण्यात यावे. ३) रोजगार हमी मध्ये अपंगांना प्रथम प्राधान्य देण्यात यावी. ४) ग्राम पंचायत स्तरावर अपंगांना स्वयम रोजगारासाठी जागा देण्यात यावी. ५) अपंगांना पंच्यात समिती मधील ५% निधी मधुन स्कुटी वाटप करण्यात यावी. वरील मागण्या ह्या आपल्या स्तरावरील असून त्वरित मंजूर करण्यात यावे. अन्यथा अपंग जनता दल सामाजिक संघटना औरगाबादजिल्हा च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. व याची सर्वस्व जबाबदारी हि आपल्या प्रशासनाची राहील. यामुळे जाकीर शेख, राजिक शाह, किशोर नागदिवे, करामत शाह, रामनाथ भागवत, संग्राम निकम, अशोक थोरात, शकील शेख, आरिफ शेख, जावेद शेख, यांची उपस्थिती होती,