लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप
वैजापूर /प्रतिनिधी/ शहरातील मदर तेरसा मुलींचे वसतिगृह येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले या वेळी सर्व प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सिद्धार्थ भुईगळ तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पडवळ, शिवाभाऊ थोरात,एबीएस ग्रुपचे अध्यक्ष विजय (बाबा) त्रिभुवन, सचिन पगारे,विलास म्हस्के,संविधान युवा मंचा चे अध्यक्ष जीवन पठारे, श्रीकांत जाधव, जगनराव गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते तर मान्यवराच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भाई शिवा थोरात यांच्या वतीने मिठाई व शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृहाचे अण्णासाहेब ठेंगडे यांनी केले तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षक प्रमोद पठारे यांनी केले तर आभार अधीक्षिका सुरेखा पाटील यांनी मानले