साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी
जालना – साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी योगदानाचा गौरव करण्यात आला.
यावेळी राजेश जोशी, देविदास देशमुख, जालना महानगर उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष निलेश गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विकास कदम, अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, ज्ञानेश्वर उगले, अकबर परशुवाले, उपाध्यक्ष ग्रामीण अनिरुद्ध पांजगे, रामदास गायकवाड, अजय लोखंडे, सनी गायकवाड, ज्ञानेश्वर सगट, जॉकी जगधने, अजय भोजने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
