साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते –
अॅड.भास्कर मगरे
अंबड/प्रतिनिधी/ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे
साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते, असे प्रतिपादन शिवसेना दलित
आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे यांनी केले.
अंबड तालुक्यातील जामखेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती
साजरी करण्यात आली. यावेळी अॅड. मगरे यांनी साठे यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधतांना
अॅड. भास्करराव मगरे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
साहित्यातून अंध श्रध्देवर असुड ओढत पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नसून
कामगारांच्या हातावर उभी आहे, तर शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार
साहित्यातून पोवाड्यातून आणि गाण्यातून पटवून देण्याचे काम केले. १५०
कथा, ३६ कांदबर्या पोवाडे आणि गाणे असे साहित्य निर्माण केले आणि
सामाजिक चळवळ आणि जातीयेताविरुध्द आवाज उठवला. श्रमिकांसाठी लढा दिला. १
ऑगस्ट रोजी जन्माला आलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे १८ जुलै
१९६९ रोजी त्यांचे निधन झाले, असेही अॅड. भास्कर मगरे यांनी सांगितले.
यावेळी आण्णासाहेब बाळराज, जय खरात, भाऊसाहेब पांजगे, देवराव म्हस्के,
संतोष पांजगे, पवार काका, गायकवाड यांच्यासह गावातील तरुण उपस्थित होते.
