एक अनमोल कहानी
एक टेलर होता त्याला एक लहान मुलगा होता. परंतु तो लहान असूनही आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असे. तो अभ्यासात देखील खूप हुशार होता.
एकदा रविवार असल्यामुळे तो आपल्या वडिलांसोबत दुकानात गेला. त्याने पाहिले की आपले वडील हे कैचीने कपडे कापतात आणि ती कैची पायाखाली ठेवतात परंतु ज्यावेळी ते सुईने कपड्यांना शिलाई मारतात परंतु ती सुई आपल्या कानावर ठेवतात. हे पाहिल्यानंतर त्याच्या मनात कुतुहल जागे झाले. काही वेळाने त्याने आपल्या वडिलांना विचारले, बाबा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे.
त्याचे वडील त्याला म्हणाले विचार तुझा काय प्रश्न विचारायचा आहे तो.तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला.मी पाहात आहे की तुम्ही कैचीने कपडे कापता आणि त्या कैची ला पायाखाली ठेवता.परंतु ज्या सुईने तुम्ही कपड्याची शिलाई करता ती सुई मात्र तुम्ही तुमच्या कानावर ठेवता असे का?.त्याचे वडील त्याला म्हणाले.ही जी कैची आहे ती कपडे कापायचं काम करते त्यामुळे मी तिला पायाखाली ठेवतो.परंतु ही जी सुई आहे ती कपडे जोडण्याचे काम करते त्यामुळे तीला कानावर ठेवतो.जे लोक समाजात समाज तोडण्याचे काम करतात त्यांना काही इज्जत नसते. समाज अशा व्यक्तींना नेहमी पुढे येऊ देत नाही. त्यांचा समाज अनादर करतो.परंतु जे लोक समाज जोडण्याचे काम करतात लोक जोडण्याचं काम करतात ती लोक नेता म्हणून लोकांच्या मनात असतात त्यांच्या तोंडी त्यांच्या नाव असतं. त्यांचा नेहमी आदर केला जातो.तेव्हा तू देखील कैची न होता सुई बनून लोकांना जोडण्याचे काम कर.
-संजय सखाराम पवार