Friday, April 3, 2026
Homeऔरंगाबादकर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्याचे माजी खासदार,शिक्षण व सहकार क्षेत्रातील महर्षी तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना येथे प्राचार्य डॉ.दादासाहेब गजहंस व मान्यवरांच्या हस्ते साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस होते.यावेळी त्यांनी टोपे साहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या शिस्तप्रिय,गुणवत्तापूर्ण व दूरदृष्टी असलेल्या कार्यपद्धतीचा गौरव केला.शिक्षण व सहकार क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक करताना उपप्राचार्य प्रा.पांडुरंग खोजे यांनी टोपे साहेबांच्या गावगाड्यातील आठवणींना उजाळा दिला.प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी टोपे साहेबांच्या दूरदृष्टीचे उदाहरण देत,त्यांचे व्यक्तिमत्त्व युवकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील,असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष करवंदे यांनी केले,तर आभार प्रदर्शन रामप्रसाद भालेकर यांनी मानले.यावेळी डॉ.कार्तिक गावंडे,डॉ.रामदास वैद्य, डॉ. रामनाथ सांगोळे,डॉ.अर्जुन जाधव,डॉ.सीमा निकाळजे,डॉ.सुजाता देवरे,प्रा.महादेव माने,प्रा. दत्ता पटाईत,डॉ.शंकर तिकांडे,कार्यालयीन अधीक्षक सुरेश ठेंग,ग्रंथपाल डॉ.तुकाराम गजर, डॉ.अविनाश भालेराव,डॉ. मसूद अन्सारी तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments