आणीबाणीच्या काळातल्या अनुभवांवर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन संपले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणीबाणीच्या काळातल्या अनुभवांवर आधारित ‘इमर्जन्सी डायरीज: इयर्स दॅट फोर्ज्ड अ लीडर’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी सांस्कृतिक कार्य मंत्री , माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून केलेले काम , बंदी घातलेल्या साहित्याचे वितरण आणि जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल माहिती देण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक , विजय चौधरी , ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर , विजय (भाई) गिरकर , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बान , राज्य कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
