Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त  वाहतुकीच्या मार्गात बदल

अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त  वाहतुकीच्या मार्गात बदल

अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त

 वाहतुकीच्या मार्गात बदल

 

जालना :- अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त दि.6 जानेवारी 2026 रोजी जवळपास दहा ते बारा लाख भाविक श्री.गणपती राजुर येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दि.5 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत जड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.

सध्याचा प्रचलित असलेला मार्ग जालना ते राजुर जाणारी वाहतुक आता जालना येथून  देऊळगाव राजा, जाफ्राबाद मार्गे जातील व येतील. सध्याचा प्रचलित असलेला मार्ग भोकरदन ते राजुर रोड जाणारी वाहतुक भोकरदन येथून राजुरकडे येणारी  अवजड वाहने जाफ्राबाद मार्गे येतील व जातील. सध्याचा प्रचलित असलेला मार्ग टेंभूर्णी ते राजुर रोड वाहतुक टेंभूर्णीकडून राजुरकडे येणारी अवजड वाहने जाफ्राबाद मार्गे येतील व जातील. तसेच सध्याचा प्रचलित असलेला मार्ग फुलंब्री ते राजुर रोड वाहने फुलंब्रीकडून राजुरकडे येणारी अवजड वाहने हसनाबाद  मार्गे भोकरदनकडे येतील व जातील. अशाप्रकारे वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments