Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादतालुक्यातील अंधानेर परिसरातून गौण खनिजांचा बेसुमार उपसा

तालुक्यातील अंधानेर परिसरातून गौण खनिजांचा बेसुमार उपसा

तालुक्यातील अंधानेर परिसरातून गौण खनिजांचा बेसुमार उपसा

कन्नड – तालुक्यातील अंधानेर परिसरातून बेकायदेशीर व विनापर्वाना अवैध मुरूम व गौण खनिजांचा खुलेआम राजरोष पणे उपसा चालू असुन,त्या बाबत लेखी स्वरूपात तक्रार देऊनही कन्नड महसूल विभागास अद्यापही जागच येतांना दिसत नाही.असा आरोप तक्रारदार समाजसेवक प्रवीण उर्फ बंटी काशिनंद यांनी केली आहे.
या बाबत तक्रारदार बंटी काशिनंद यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना असे सूचित केले की,त्यांनी अंधानेर परिसरातून होत असलेल्या गौण खनिजांच्या अवैध उपशाबाबत कन्नडचे प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांचे कडे दि.15 रोजी लेखी तक्रार देऊन अवैधरित्या होत असलेल्या वाहणावर व त्यांच्या मालकांवर कार्यवाई व्हावी म्हणून तहसीलदार सह उपविभागीय अधिकारी कन्नड यांचेकडे मागणी केलेली असतांनाही अद्यापपर्यंत त्यावर कुठलीही पुढील ठोस अशी कार्यवाई होतांना दिसून आलेली नाही.त्यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात असेही नमुद केले आहे की,वरील शिवारातील गट क्र.57मधुन 50 ब्रास मुरूम अवैध वीणा आवक – जावकचा क्र.नसतांनाही वाहणांची आरटीओ फिटनेस तथा वाहनांचा जीपीएस नसतांनाही या वाहणातून गौण खनिज वाहतूक करण्याची कशीकाय परवानगी देण्यात आली,ते न उमजणारे कोढे होऊन बसले आहे.त्यात त्यांनी पुनःच अशीही तक्रार केली आहे की,सदरचा उपसा हा शासकीय सुट्टीच्या कालावधीत करण्यात आला असुन यात तहसील कार्यालयातील लिपिक दुभाळकर तथा कोतवाल शेजवळ यांनी चिरीमिरीचा व्यवहार करून चार दिवसाची मुदतवढ दिल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.याच मुदतवाडीत माफि्यांनी गौण खनिजांची वाहतूक जवळजवळ 300 ते 400 ब्रास मुरूमाचा केली आहे.सदरचा उपसा करून महसूलास चुना लावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.तसेच तक्रार करूनसुद्धा महसूल विभागा अंतर्गत येत असलेल्या या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी साधा तलाठी महोदय सुद्धा या ठिकाणी आलेला नाही.तक्रार दाराचे पुढे असेही म्हणणे आहे.की,जर यावर तहसीलच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने दखल न घेतल्यास मा.न्यायालयात जावे लागेलच असा इशारा त्यांनी दिला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments