गल्लेबोरगाव येथून अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा रवाना गल्ले बोरगाव येथून अमरनाथ यात्रेसाठी गेल्येल्या ७५ भाविकांनी घेतले बाबा बर्फनीचे दर्शन
खुलताबाद/प्रतिनिधी/ प्रति वर्षी तालुक्यातील गल्ले बोरगाव येथून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीर येथे जात असतात, सालाबादप्रमाणे या ही वर्षी गल्ले बोरगाव येथून अमरनाथ यात्रेसाठी ७५ भाविक युवकांचां जथ्था अमरनाथ यात्रेसाठी गेला असून, सदर भाविकांनी दि.३ रोजी पवित्र शिवलिंग बाबा बर्फणीचे दर्शन घेतले.
दरम्यान तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी भाविकांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
शुक्रवार दि. २६ रोजी सायंकाळी बम बम बोले, हर हर महादेवच्या जयघोषात, भाविक अर्जुन बढे, नामदेव खोसरे, खंडू फुलारे, गोरख बोडखे, मनोज कऱ्हाळे, परसराम औटे, वैभव वडगावकर, ऋषिकेश नलावडे, नामदेव तळेकर, यांच्यासह ७४ भाविकांना सर्वाचा प्रवास सुखाचा होऊ दे अशी अमरनाथ बर्फानी भोले बाबाच्या चरणी प्रार्थना करीत सर्वांना शुभेच्छा देऊन ग्रामस्थांनी भाविकांना पुढील यात्रेसाठी रवाना केले होते.
सदर भाविकांचे नुकतेच बाबा बर्फानीचे दर्शन झाले असून, दर्शनाने आम्ही धान्य झाल्याची प्रतिक्रिया या भाविकांनी दिली.
या वेळी सरपंच विशाल खोसरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बढे, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य अरुण पाटे, मुकेश राजपूत, अनिल खोसरे, बाबासाहेब वीर, ईश्वर जोशी, मानसिंग राजपूत, जितेंद्र हारदे, नंदू बूखार, नारायण शेळके, संभाजी वाघ, यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.
