गंगापूर/प्रतिनिधी/ बातमीचा परिणाम बातमी प्रसिद्ध करताच आमदार प्रशांत बंब यांनी तहसीलदार यांना कारवाईचे दिले दि १० नोव्हेंबर रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने आण्णासाहेब जाधव, राहुल ढोले,इंजी.महेशभाई गुजर यांनी गंगापूर तहसीलदार यांना जुन्या तहसिल कार्यालयात फार्मर आयडी मंजुरी प्रक्रियेसंदर्भात गंभीर अनियमितता निदर्शनास आली आहे. प्राप्त माहितीनुसार,काही नेमणूक केलेले कर्मचारी फार्म आयडी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांकडून फार्मर आयडी मंजुरीसाठी प्रति शेतकरी ₹१५० इतके अनधिकृत शुल्क घेत आहेत असे निवेदन दिले होते.परंतु कारवाई न झाल्याने त्याची प्रत व पुरावे आमदार प्रशांत बंब यांना दि १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ईमेल द्वारे देण्यात आली. संबंधित बाब अत्यंत प्रकरण गंभीर असल्याने आमदार प्रशांत बंब यांनी लगेच दि १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता गंगापूर तहसीलदार यांना पत्र काढून शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अतिवृष्टी अनुदानास विलंब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी मंजूर न झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. असे असल्यास सदर कृत्य प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. काय आहे आदेश १. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी.
२. शेतकऱ्यांकडून घेतलेले अनधिकृत शुल्क परत करण्यात यावे. ३. फार्मर आयडी मंजुरी प्रक्रिया पारदर्शक व विनाशुल्क करण्यात यावी. ४. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात.शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी.असे पत्र दिले.
आमदार प्रशांत बंब यांच्या पत्राची दखल घेत गंगापूर तहसीलदार यांनी फार्मर आयडी अपलोड करुन घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी गंगापूरला येऊ नये.सर्व प्रलंबित फार्मर आयडी अपलोड केली जातील.ज्यांच्या तृटी आढळून येतील त्यांना वेळ देऊ बोलवण्यात येईल.यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयातील दत्तु कर्हाळे यांना कळविले आहे.त्या अशी माहीती फोन वर शेतकरी कृती समितीला दिली आहे.