आमदार नारायणजी कुचे व माजी आमदार विलासराव खरात यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.देवयानी केदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार
जालना/प्रतिनिधी/ अंबड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.देवयानी केदार कुलकर्णी यांनी गुरुवारी दि.१ रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषद कार्यालयात आयोजित पदग्रहण सोहळ्यात अधिकृतपणे पदभार स्वीकारला.हा पदग्रहण सोहळा आमदार नारायणजी कुचे व माजी आमदार विलासराव खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या पदग्रहण सोहळ्यापूर्वी केदार दादा कुलकर्णी यांच्या निवासस्थानापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत जल्लोषात दुचाकी रॅली काढण्यात आली.या रॅलीत भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.घोषणाबाजी व फटाक्यांच्या आतषबाजीत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी विलासराव खरात,भाजपचे नगरसेवक बाबर ज्योती कृष्णा,वराडे गंगाधर मच्छिंद्र,कुचे उज्वल देविदास,कुलकर्णी सविता सौरभ,शहाणे ताराबाई बबनराव,खरात विश्वजीत विलासराव, जाधव बंडू साहेबराव,खरात मंगल दिलीपराव, सचिन लक्ष्मण खरात,(रासपा) शेख बदरुन्निसा बेगम खुर्शीद अहमद,शेख फिरोज शेख अजीज, वराडे पद्माबाई बाबुराव,कुलकर्णी केदार भवानीदास,खरात रंजना शाहूल,गुढे सावित्री सुरेश, राजपूत विठ्ठलसिंग नारायणसिंग यांच्यासह भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष सौ.देवयानी केदार कुलकर्णी यांनी अंबड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल,असे सांगितले.आमदार नारायणजी कुचे यांनीही नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छा देत अंबड शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नव्या नेतृत्वाखाली अंबड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल,अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.