वैजापुरात “आमचा देवाभाऊ” अभियानांतर्गत रक्षाबंधन कार्यक्रम
वैजापूर/प्रतिनिधी/ “आमचा देवाभाऊ” या अभियानांतर्गत भाजपतर्फे शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील स्वामी समर्थ नगर परिसरात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लाडक्या बहिणींचा (देवाभाऊ )यांना रक्षाबंधनानिमित्त बहिणींनी राखी पाठवली. महिलांसाठी शासनाकडून लाडक्या बहिणींना दरमहा मिळणारे पंधराशे रुपयांचे मानधन तसेच बस प्रवासासाठी अर्धे तिकीट व इतरही राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल समाधानी असल्याचा अभिप्राय नोंदवताना उपस्थित महिला दिसल्या.
यावेळी माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,माजी नगरसेवक दिनेश राजपूत,नगरसेवक राजेश गायकवाड,प्रेमभाऊ राजपूत, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष शैलेशभाऊ पोंदे, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष विनोद राजपूत, सन्मित खनिजो यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या