Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादअंबड पुरवठा विभागाची मोठी कारवाई;वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात छापे

अंबड पुरवठा विभागाची मोठी कारवाई;वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात छापे

अंबड पुरवठा विभागाची मोठी कारवाई;वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात छापे

१७ गॅस सिलेंडर जप्त;अवैध साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले
​जालना/प्रतिनिधी/ जिल्हा प्रशासन व पुरवठा विभागाच्या वतीने अवैध साठेबाजी आणि पुरवठा साखळीतील अनियमिततेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज, १८ मार्च २०२६ रोजी मोठी कारवाई करण्यात आली.अंबड शहर,वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये १७ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.सदर कारवाई जालना जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर तसेच अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.​कारवाईचे स्वरूप आणि पथक अंबडचे पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी आपल्या विशेष पथकासह ही मोहीम राबवली.या पथकामध्ये तलाठी सतीश शिंदे,अविनाश देवकर,कृष्णा शिंदे यांचा समावेश होता.पथकाने वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोल नाका या दोन महत्त्वाच्या ठिकाणी कसून तपासणी केली असता,नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.​”पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेली ही कारवाई नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एक कठोर इशारा आहे.गॅस सिलेंडरची अवैध विक्री किंवा साठेबाजी खपवून घेतली जाणार नाही.भविष्यातही अशाच प्रकारची तपासणी आणि कारवाई सुरू राहील,”असे पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी यावेळी स्पष्ट केले.या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून,जप्त केलेल्या गॅस सिलेंडर बाबत अधिकृत अहवाल व पुढील कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण केली जात आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments