अंबड नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वादळ — देवयानी केदार कुलकर्णींच्या प्रवेशानं विरोधकांचा समतोल ढासळला; शहरात ‘बदलाच्या लाटेची’ जोरदार चर्चा
अंबड/प्रतिनिधी/ अंबड नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी–रासप महायुतीकडून देवयानी केदार कुलकर्णी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा होताच शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पहिल्याच प्रचार सभांनी घेतलेला वेग आणि सादर केलेला विकासनामा पाहता विरोधक स्पष्टपणे बचावात्मक भूमिकेत गेलेले दिसत आहेत.
शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सुरक्षा, रस्ते आणि रोजगाराच्या प्रश्नांवर विरोधकांनी केलेल्या ‘दुर्लक्षाचा’ उल्लेख करत देवयानी कुलकर्णी यांनी प्रहारांची मालिका सुरू केली आहे.
जुने चेहरे, जुनी वचने… अंबडला कुठेही नाही नेले,
या वेळी जनता म्हणते — बदल आता ठरले!”