आज जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा जिल्हा मेळावा
राज्याध्यक्ष संजीव निकम यांच्या सह मराठवाडा विभागातील पदाधिकारी राहणार उपस्थित
आष्टी/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ शनिवारी सकाळी अकरा वाजता *ग्रामपंचायत अधिकारी भवन* जालना येथे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई.१३६ जिल्हा शाखा जालना चे जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे सरचिटणीस व्ही.ए.भगत यांनी दिली आहे
जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी राज्य अध्यक्ष संजीव निकम, राज्य कोषाध्यक्ष भिमराज दाणे पाटील, राज्य महिला उपाध्यक्ष श्रीमती दुर्गा भालके,राज्य सल्लागार विजयसिंह नलावडे, विभागीय उपाध्यक्ष दिलिपराव पांढरे पाटील, विभागीय सहसचिव सखाराम काशीद यांच्या सह मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत
जिल्हा मेळाव्यात राज्य स्तरावर संघटनेचे माध्यमातून होत असलेल्या आणि झालेल्या कामकाजाचा विषयी चर्चा करून माहिती दिली जाणार असुन,सध्द परीस्थिती मध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या ग्रामपंचायत अधिकारी संवर्गा संदर्भात सुरू असलेल्या अपमानास्पद वागणूक आणि दबाव तंत्राचा होत असलेल्या अतिरेकावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी तसेच जिल्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध अडीअडचणी वर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी निर्णय घेतला जाणार आहे
तरी जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी यांनी जिल्हा मेळाव्यास शंभर टक्के उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, मानद अध्यक्ष पी.बी.पवार,सरचिटणीस व्ही.ए.भगत, कार्याध्यक्ष एम.एम.मिसाळ, कोषाध्यक्ष एस.व्ही.पुरी, उपाध्यक्ष संजय काचेवाड,पी.पी.पालवे, सुरेखा लाखोले यांच्या सह जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष/सचिव यांनी केले आहे
