Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट जालना महानगरपालिकेत स्वबळावर लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट जालना महानगरपालिकेत स्वबळावर लढणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट जालना महानगरपालिकेत स्वबळावर लढणार

जालना/प्रतिनिधी/ जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) महायुतीमध्ये निवडणूक रिंगणामध्ये होता. परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला येणाऱ्या जागेच्या संदर्भात कोणतीही स्पष्टता समोरून नआल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार स्वबळावर लढण्याची तयारीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची प्रदेश उपाध्यक्ष मा. मधुकरराव आर्दड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद यांनी सांगितले आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी उद्या दि.30 डिसेंबर २०२५ वार मंगळवार रोजी सकाळी ९.०० वाजता पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे शेवटचे दिवस असल्यामुळे तातडीने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय मंठा – अंबड रोड  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळ जालना येथे संपर्क साधावा असे आवाहन पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments