Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादआई -वडिलांनी दिलेले पैसे साठवून बालचिमुकल्यांनी बसवला गणपती

आई -वडिलांनी दिलेले पैसे साठवून बालचिमुकल्यांनी बसवला गणपती

आई -वडिलांनी दिलेले पैसे साठवून बालचिमुकल्यांनी बसवला गणपती 

जालना/प्रतिनिधी/ गणपती उत्सवात सध्या सार्वजनिक मंडळ म्हटल की
मोठ मोठे तरुण व मोठमोठी मित्र मंडळ सहभागी असतात किंवा राजकीय पाठबळ
असते. त्यात मग मंडळाच्या आपसत स्पर्धा होऊन मोठ मोठे डीजे अन
एकमेकापेक्षा खर्च जास्त कोण करेल ही असू या निर्माण होते. या सर्व
बाबीला कलाटणी देत जालना येथील सोनलनगरमध्ये एकच गणपती विराजमान करण्यात
आले.
वक्रतुंड गणेश मंडळ स्थापन करून श्रीची स्थापना झाली. विशेष म्हणजे या
मंडळात अगदी ६ वर्ष वयाच्या पहिलीच्या मुळापासून ते पदविला शिकणार्‍या २१
वर्षीय तरुणाचा सहभाग आहे. कोणताही बडेजावपणा न करता या मंडळातील या बाल
गोपाल सदस्यानी सोनलनगर मधील आपल्या आई -वडिलांनी वेळोवेळी दिलेले पैसे
साठवून व काही कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून हा उत्सव साजरा केला आहे.
विशेष म्हणजे या मुलांनी सोनलनगर मधील मुलासाठी विविध स्पर्धा घेऊन
त्याना ही सार्वजनिक गणेशोतस्वाचे खरे रूप उलगडून दाखवले आहे. वकृत्व
स्पर्ध, निंबध स्पर्धा, रंगोली स्पर्धा, संगीत खुर्ची तसेच महिलासाठी ही
विविध खेळ येथे या मंडळाने आयोजित करून सर्वाचे लक्ष वेधले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments