अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीची टेल सात्वीक भोज येथे पत्रकार परिषद संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जालन्यात 30 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन…
जयंती ऊत्सव समितीचे अध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांनी दिली माहिती.
जालना /प्रतिनीधी / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जालन्यात 30 मे रोजी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय. 30 मे 2025 रोजी अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. 30 मे रोजी सकाळी 9 वाजता अहिल्यादेवी होळकर यांना पारंपरिक वेशभूषा करून तसेच पारंपारिक वाद्यसह अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10 वाजता शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे. सदरील मोटरसायकल रॅली राजमाता अहिल्यादेवी स्मारक अंबड चौफुली पासून संपूर्ण शहरांमधून निघणार आहे यामध्ये 500 मोटरसायकल असणार आहेत रॅली मार्गांमध्ये येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.
दुपारी बारा वाजता मिठाई आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय सायंकाळी 5:30 वाजता संगीतांचा आणि स्टँडींग डि.जे.शो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दि.26 सोमवार रोजी सकाळी बारा वा. च्या सुमारास हाॕटेल सात्वीक भोज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर, उपाध्यक्ष पांडुरंग कोल्हे, सचिव कैलास चोरमारे, स्वागताध्यक्ष नितीन कानडे, सर्जेराव सरोदे, सहसचिव रामराव कोल्हे, कोषाध्यक्ष जनार्दन जारे तसेच शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष दीपक डोळझाके, उपाध्यक्ष रोहित सुर्ण, सचिव राम जोशी, स्वागत अध्यक्ष कृष्णा गायके, कोषाध्यक्ष ओम काळे यांच्यासहित इतरांची उपस्थिती होती.