Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादअग्रवाल महिला मंडळाच्या प्रश्नमंच स्पर्धेने महिलांच्या धार्मिक - सामान्य ज्ञानाची कसोटी 

अग्रवाल महिला मंडळाच्या प्रश्नमंच स्पर्धेने महिलांच्या धार्मिक – सामान्य ज्ञानाची कसोटी 

अग्रवाल महिला मंडळाच्या प्रश्नमंच स्पर्धेने महिलांच्या धार्मिक – सामान्य ज्ञानाची कसोटी 
 भ.महावीर जन्म कल्याणक महोत्सव महिला समिती अंतर्गत   अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळ सराफा-हडको तर्फे शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या धार्मिक व सामान्यज्ञान प्रश्नमंच स्पर्धेने महिलांच्या ज्ञानाची कसोटी लागली.
     श्री. शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन मंदिर सराफा येथील प्रश्नमंचमधे शब्दकोडे, पहेली, उत्तर शोधा, दिमाग की बत्ती जलाव, पशु व पक्षांच्या नावाने प्रारंभ होणारी उत्तरे, आहार, अक्षर जोडा, गणित, धर्मक्षेत्रांचे राज्य कोणते ?  तसेच रामायण पात्र आदी विषयी प्रश्न विचारण्यात आले होते.
    याप्रसंगी  अग्रवाल महिला मंडळाच्या सीमा साहूजी, नीलम साहूजी, सुषमा साहूजी, ज्योती साहूजी, सुनीता साहूजी, दिपाली साहूजी, सुनंदा साहूजी, रिता साहूजी, भावना साहूजी, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अर्चना साहूजी यांनी तर राशी साहुजी यांनी आभार मानले. राजश्री शहा यांनी मंगलाचरण म्हटले.
प्रारंभी महिला मंडळासह मंदिर विश्वस्त मुकेश साहूजी, सागर साहूजी, आदित्य साहूजी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी महिला समितीच्या भारती बागरेचा, सारिका साहूजी, प्रीती साहूजी, प्रीती सेठीया, करूणा साहुजी  , सविता लोढा, मनीषा भन्साळी, मंगल पारख, संगीता संचेती, नीता गादिया,भावना सेठिया, पुष्पा बाफना, पल्लवी शहा, तनुजा गांधी, साधना शहा, अनीता पहाडे, आदी उपस्थित होते.
दीप प्रज्वलन महर्ष समितीचे प्रतीक साहुजी, अजय सिंघवी श्रेणिक कासलीवाल हितेश कांकरिया पंकज साकला, बाहुबली वायकोस, पुष्पा बाफना, कविता अजमेरा, छाया क्षीरसागर, मंगला क्षिरसागर, लता अन्नदाते आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments