अग्रवाल समाजाचा ओबीसीत समावेशासाठी
पुढाकाराबद्दल ॲड. धन्नावत यांचा सत्कार
लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संपूर्ण समाज पाठीशी- रोहित अग्रवाल
जालना/प्रतिनिधी/ अग्रवाल समाजाचा राष्ट्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेशाच्या मागणीसाठी सातत्याने पुढाकार घेणारे ॲड. महेश धन्नावत यांचा जालना येथे सामाजिक कार्यकर्ते मयूर अग्रवाल आणि समाजाचे युवा नेतृत्व रोहित अग्रवाल , मोहित अग्रवाल यांच्यावतीने छोटेखानी कार्यक्रमात समाज बांधवांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
समाजहितासाठी सातत्याने झटणाऱ्या नेतृत्वाचा हा सन्मान असल्याचे मयुर अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले. रोहित अग्रवाल म्हणाले की, ॲड. महेश धन्नावत यांनी समाजाच्या हक्कासाठी जो आवाज उठवला, तो प्रेरणादायी आहे. या लढ्याला आता अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संपूर्ण समाज एकत्र येईल. ही लढाई केवळ पत्रव्यवहारात मर्यादित राहणार नाही, तर ती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवली जाईल. या मागणीसाठी समाज चळवळ उभी केली जाईल आणि समाजाचा ओबीसी सुचित समावेश करण्यासाठी आवश्यक पुरावे संकलित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले.
यावेळी महेश धन्नावत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, समाजाच्या मूलभूत मागण्यांसाठी कार्य करणे ही माझी जबाबदारी मानतो. हा सन्मान माझा नाही, तर अग्रवाल समाजाच्या सामूहिक इच्छाशक्तीचा गौरव आहे. हा पाठिंबा माझ्या कामाला अधिक बळ देणारा ठरणार आहे. समाजात वाढत असलेली जागरूकता आणि संघटनेची गरज लक्षात घेता, लवकरच पुढील पातळीवर बैठकांचे आयोजन करण्यात येऊन, ओबीसीत समावेशाच्या मागणीसाठी समाज वज्रमुठ आवळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.