आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागितलेली माहिती गट विकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. गंगापूर तालुक्यातील भालगाव येथे ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामात काही कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राहुल अण्णासाहेब काकडे यांनी केला आहे. सदर भालगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावात झालेल्या विकास कामाची माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत गंगापूर पंचायत समितीत तब्बल १५ माहितीचे अधिकार अर्ज दाखल केले परंतु पंचायत समितीकडून फक्त दोन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तर बाकी अर्जावर सुनावणी घेण्यात आलेली नाही. दोन अर्जांवर सुनावणी झाली परंतु त्यावर काय निकाल देण्यात आले ते सुद्धा मला कळवण्यात आलेले नाही अशी माहिती राहुल अण्णासाहेब काकडे यांनी दिली. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे यांच्याकडे माहिती संदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला उडवा उडवी चे उत्तर दिले तुला कोणाकडे अर्ज करायचे करून टाक तुला कोणत्या चैनल ला बातमी टाकायची टाकून दे मी काही घाबरत नाही. असे उत्तर देत निघून गेले असा आरोप राहुल अण्णासाहेब काकडे यांनी केला आहे. भालगाव ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी व गंगापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व सदर पंचायत समितीतील अधिकारी सर्वांच्या संगनमताने माहिती देण्यात येत नाही असा आरोप राहुल अण्णासाहेब काकडे यांनी केला आहे. माहिती देण्यास टाळाटाळ करण्याच्या मागे कारण काय आपले पितळ उघडे होण्याच्या भीतीपोटी माहिती देण्यात येत नाही का? असा देखील त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे.