अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर मोती तलावात बुडालेल्या दोन भावंडाचे मृतदेह सापडले
चंदनझीरा पोलिसांनी दोघांचे मृतदेह घेतले ताब्यात
पंचनामा करून दोन्ही मृतदेहांना शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले..
जालना/ प्रतिनीधी / दिनांक 26 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील मोती तलावामध्ये जुनेद आसेफ सय्यद वय 19 आणि आयान आसेफ सय्यद वय 15 हे दोन सख्ख्या भावंडाचा मोती तलावातील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला होता.
यावेळी स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाचे जवानांनी बोटच्या साह्याने गळ टाकून दोन्ही मुलांचा मृतदेह शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले.
तब्बल अडीच तास त्यांच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू होती. चंदनझीरा पोलीस, अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून दोन्ही मृतदेह चंदनझीरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेहांना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
पुढील तपास चंदनझीरा पोलीस करत आहेत.