Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादआदमपूर रानाशिवारात बुजगावण्यांची भरली शाळा 

आदमपूर रानाशिवारात बुजगावण्यांची भरली शाळा 

आदमपूर रानाशिवारात बुजगावण्यांची भरली शाळा 

नांदेड/ बिलोली तालुक्यातील आदमपूर परिसरातील गावोगावी शेत शिवारात अशी कृञिम पण जीवंत वाटणारी बुजगावणी रानातील पशू,पक्षी,डुकरे,हरण, मोर,घुस आदि प्राण्यांपासून शेतकरी आपल्या पेरलेल्या पिकांचे संरक्षण करण्याकरिता शेतात मधोमध किंवा अवतीभवती उभी करीत असल्याचे चिञ पहावयास मिळते आहे.मग एकदम शिवारात शाळाच भरली की काय असा तद्क्षणी भास होतो.
जगाचा पोशिंदा कुणबी शेतकरी रक्ताचे पाणी करून आपले अन्न पिकवितो.या महागाईच्या जमान्यात कधी रोख तर कधी रीन काढून बी-बियाणांची लागवड केली जाते.
त्याच पिकांची उगवण झाल्यानंतर रानातील वन्यजीवांपासून ते राखण करीत शेतकरी राञी अपराञी शेत शिवारात फिरत असतात.त्यातंच अशी कृत्रिम बुजगावणी राना शिवारात सहज नजरेस पडतात.
ती अगदी हुबेहुब काही क्षण माणसांसारखी दिसतात.वन्यजीव सुद्धा काहीवेळा यामुळे भुजली जातात.त्यासाठी आपले पीक वाचवण्याची ‘आयडिया’ फक्त शेतकरी कुणबी राजाच करू शकतो,हे माञ अनादीकाळापासून
अगदी सत्य आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments