Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादआदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह संपन्न ...!

आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह संपन्न …!

आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह संपन्न …!
आत्ताच एक्सप्रेस  
सोयगाव/प्रतिनिधी/   जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथील आदर्श शिक्षक तसेच तिडका येथिल माजी पोलीस पाटील रामचंद्र महाकाळ ( दि.११ ) रविवारी  पेडगाव ता.सिल्लोड येथिल साईनाथ अंभोरे याची कन्या शुभांगी यांच्याशी साखरपुडा पेडगाव येथे आयोजीत केलेला होता, साखपुडाच विवाह पार पडल्या.
 दरम्यान समाजातील ज्येष्ठ मंडळीनी लग्नाचा प्रस्ताव वर पिता डिगाबर महाकाळ व वर रामचंद्र महाकाळ व वधू पिता साईनाथ अंभोरे यांच्या कडे मांडला असता या प्रस्तावाला वर व वधू यांनी मान्यता दिली व लगेचच संध्याकाळी लग्न लावण्यात आले. सरकारी नोकरदार असून सुध्दा आजच्या या झगमगाटीच्या जगात साध्यापध्दतीने लावल्या बदद्ल तिडका येथिल महाकाळ परीवार व पेडगाव येथिल अंभोरे परीवाराचे कौतुक होत असून समाजातील सर्वानी या विवाहाचा आदर्श घेण्यासारखा आहे या आदर्श विवाहासाठी विशेष सहकार्य केंद्रीय शाळा सोयगावचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, स्वामी दयानंद माध्यमिक विद्यालय तिडका येथिल मुख्याध्यापक  सुनील सरदार राजपुत, किसनदादा खंबाट , मुलीचे वडील साईनाथ अंभोरे, मुलीचे काका भागवत अंभोरे, मुलीचे मामा दत्तू गवांडे वाकी, मुलाचे वडील दिगंबर महाकाळ, दिगंबर जाधव, दिलीप क्षीरसागर पुंडलिक कदम याच्या सहकार्याने आदर्श  साखरपुड्यातच लग्न संपन्न झाले.कैतुकास्पद असि आदर्श शाळेतील आदर्श शिक्षकाचा आदर्श विवाह असेच म्हणावे लागेल.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments