ऍड.अनिल मिश्रा वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!डॉ.हुलगेश चलवादी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे संविधान लिहणारे,सामाजिक न्यायाचे जनक, विश्वरत्न, ज्ञानसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या विरोधात बहुजन समाज पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ मधून महामानव डॉ.बाबासाहेबांचा अनादर करीत चुकीचे दावे करणाऱ्या ग्वाल्हेर येथील ऍड.अनिल मिश्रा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,अशा मागणीचे पत्र बसपा ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असल्याची माहिती, प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी(ता.९) दिली.
शरण येऊन देखील पोलीस मिश्राला अटक करू शकले नाहीत.अशात त्याच्यावर देशद्रोशाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाची गुलामगिरी केली नाही, तर गुलामगिरीत खितपत पडलेल्या असंख्य भारतीयांना तथाकथितांनी नाकारलेला जगण्याचा अधिकार मिळवून दिला. बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार आणि चळवळ आम्हाला प्रेरणादायी होती, आहे आणि राहील.
ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कुठलेही योगदान नव्हते अशा विचारधारेतील दानवी वृत्तीला आंबेडकरी चळवळीचा नेहमीच हेवा वाटतो. यातूनच मिश्रा सारखे मूर्ख आणि धूर्त लोक अशी भाषा वापरून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात, असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.मिश्रा वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा बसपा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
**चौकट**
…त्या मनुवादी मानसिक रुग्णावर गुन्हा दाखल करा
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा.बी. आर.गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुवादी मानसिक रुग्ण राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बसपा ने राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे.न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर हल्ला निषेधार्य आहे. बसपाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. संविधानाने ‘एक व्यक्ती,एक मूल्य’ देत धर्मनिरपेक्ष विचार स्वातंत्र्य दिले आहे.परंतु, किशोर यांचे वर्तन विचार स्वातंत्र्याच्या अधिकाराचा दुरुपयोग आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.अशा मनूवादी मानसिक रुग्णावर गुन्हा दाखल करीत त्याला मनोरुग्णालयात पाठवा अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
