घनसावंगी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.अंबर मते .तर सचिव पदी ॲड. गजेंद्र तांगडे यांची बिनविरोध निवड
घनसावंगी/प्रतिनिधी/ घनसावंगी येथील वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अंबर काशिनाथ मते यांची बिनविरोध निवड होऊन नव्या कार्यकारिणीचा ताबा घेण्यात आला आहे. या निवडीमुळे वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या विधीज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नव्या नेतृत्वाकडून संघाच्या सर्वांगीण प्रगतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.घनसावंगी वकील संघाची मागील कार्यकारिणीची मुदत संपल्याने नव्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया हाती घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विठ्ठल उडाण आणि ॲड. सतीश देवडे पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी प्रारंभी अनेक विधीज्ञांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, 9 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या वकील संघाच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात एकमत निर्माण झाले. परिणामी, कोणतीही निवडणूक न लागता कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. या निवडीत अध्यक्षपदी ॲड. अंबर काशिनाथ मते, उपाध्यक्ष ॲड. एकनाथ देवडे, सचिव ॲड. गजेंद्र तांगडे, सहसचिव ॲड. सचिन चव्हाण आणि कोषाध्यक्ष ॲड. श्यामसुंदर तांगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने विधीज्ञांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवण्याची व संघ अधिक सक्षम आणि एकत्रित करण्याची ग्वाही दिली आहे.यानिमित्ताने आयोजित सत्कार समारंभात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सर्व सन्मानिय वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने विधीज्ञ मंडळी उपस्थित होती.