अचानक लागलेल्या आगीत दोन एकर वरील हरभरा पिकाचे नुकसान
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ प्रतिनिधी/विजय पगारे /सोयगाव तालुक्यातील घोसला येथील अरुण गंगाराम बावस्कर यांच्या गट नंबर १९३ शिवार घोसला येथे अचानक आग लागून दोन एकर हरभरा पिकाचे जमा केलेल्या ढीगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळसाबाई अरुण बावस्कर या सकाळी सात वाजून ३० मिनिटांनी शेतात काम करायला गेले असता शेतामध्ये त्यांना दोन एकर क्षेत्रावरील हरभरा पिकाचे ढिगारा जमा असलेल्या ठिकाणी अचानक आग लागलेली दिसल्याने त्यांनी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना कळविले असता एक मोठी खळबळ उडाली व अचानक लागलेल्या आगे मुळे दोन एकर क्षेत्रावरील हाता तोंडाशी आलेले हरभरा पिक नष्ट झाल्याने एका अल्पभूधारक शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथे महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी भेट देऊन पंचनामा केला असता दोन एकरावरील काढणीला असणारा हरभरा हा जवळपास अंदाजे १५ क्विंटल उत्पन्न लक्षात घेता अंदाजे किंमत ८० हजाराचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे.व तसा पंचनामा महसूल अधिकारी तलाठी गोरखनाथ गव्हाणे तथा कृषी सहाय्यक वैष्णवी भगत यांनी केला आहे व वरिष्ठांकडे अहवाल दाखल करत लवकरच मदत मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे आश्वासन त्यांनी दिले. या घटनेमुळे ही आग अचानक लागली की अज्ञात इसमाने लावली अशा विवंचनेत सर्वजण पडलेले दिसत आहेत. या घटनेमुळे घोसला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.