आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जणांचा रिपब्लिकन सेनेत पक्ष प्रवेश
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ शासकीय विश्रामगृह गंगापूर या ठिकाणी सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जणांनी रिपब्लिकन सेनेत पक्ष प्रवेश केला. हा कार्यक्रम काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष पश्चिम , मनिषा ताई साळुंखे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी , राहुल कानडे युवा जिल्हाध्यक्ष पश्चिम यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन बाबा भिवसने जिल्हा सचिव पश्चिम , आनंद भिवसने तालुकाध्यक्ष गंगापूर , अबू चाऊस शहराध्यक्ष गंगापूर , ज्योतीताई नवले तालुका अध्यक्ष महिला आघाडी गंगापर यांनी केले होते. या वेळी सुरेश खंडागळे सह किशोर बनकर,अनेकांनी पक्ष प्रवेश घेतला. सुरेश खंडागळे तालुका महासचिव, किशोर बनकर तालुका संघटक, आकाश बनकर, सह संघटक अब्दुल चांद शेख तालुका उपाध्यक्ष, संदीप पवार, तालुका उपाध्यक्ष, सुरेश शिंगारे तालुका उपाध्यक्ष नवनाथ नरवडे, तालुका उपाध्यक्ष, पंडित राबडे गंगापूर शहर उपाध्यक्षष, यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच अमोल कानडे युवा तालुका अध्यक्ष, गंगापूर विनोद वाकोडे तालुकाध्यक्ष पश्चिम, अनिल हिवाळे वाळुज महानगर अध्यक्ष, मिलिंद शिरसाट सर्कल प्रमुख , पुरुष , महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.