Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे...

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश 

जालना/प्रतिनिधी/ जालना शहरातील उद्योग नगरी परिसरातील श्री सत्यजित राय, उत्तर भारतीय संघाचे शितला प्रसाद पांडे व उत्तर भारतीय नागरिकांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन जालना ते पटना रेल्वे मार्गाची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जालना व परिसरातील सुमारे पंचवीस हजार उत्तर भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी या गाडीची मागणी केली.

या प्रयत्नाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने नांदेड-रायचूर व पूर्णा- पटना या दोन्ही गाड्यांचा विस्तार आता जालना पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-रायचूर ही गाडी तात्पुरत्या स्वरूपात जालना वरून सुरू होणार असून प्रथमतः नांदेडला जाईल आणि त्यानंतर रायचूरपर्यंत धावेल.

तसेच पूर्णा-पटना ही गाडी देखील जालना पासूनच उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे जालना, परभणी, पूर्णा व नांदेड या भागातील प्रवाशांना रायचूर व पटना भागात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ व खर्च वाचणार आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून होत असून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments