Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून  लघु उद्योगासाठी अर्थसहाय  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून  लघु उद्योगासाठी अर्थसहाय  

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळाकडून  लघु उद्योगासाठी अर्थसहाय

 

जालना :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत यापूर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतेलेल्या मातंग  व तत्सम 12 पोट जाती समाजातील वैयक्तिक अर्जदारांना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दीष्टानुसार विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याकरीता कर्जाचे अर्ज देणे व स्वीकृतीचा कार्यक्रम कार्यालयीन वेळेत संबंधित महामंडळाचे जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष अर्जदार व्यतिरिक्त इतर त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज स्विकारले जाणार नाहीत.  या योजनेसाठी सन 2025- 26 या आर्थिक वर्षाकरीता प्राप्त उद्दिष्टे अनुदान कर्ज योजनेसाठी 75 व बिज भांडवल कर्ज योजनेसाठी 50 असे आहे.  अर्ज स्वीकृतीच्या वेळेस अर्जदाराने सर्व मुळ कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, कोटेशन इत्यादी कागदपत्रे बाळगावी. असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments