आमदार जाधवांच्या वक्तव्यामुळे संभाव्य उमेदवारांचा हिरमोड
कन्नड/ शहरातील गजानन हेरिटेज कार्यालयात दीपावली निमित्य आयोजीत केलेल्या स्नेहमीलन कार्यक्रमात आ.संजनाताई जाधवांनी केलेल्या भाषणामुळे अनेक संभाव्य उमेदवारत नाराजीचे सुर उमटले असुन त्यांचा संपूर्णतः हिरमोड झालाचे दिसून आले.
या आयोजीत स्नेहमीलन कार्यक्रमासाठी तालूका भरातून होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाचे वतीने काही अशादायक विचार व मार्गदर्शन ऐकावयास मिळेल आशा उद्देशाने अनेक संभाव्य पं.स.जि.प.नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाचे दावेदार संभाव्य उमेदवार या कार्यक्रमास आले होते.पण आ.संजनाताईंनी केलेल्या भाषणात त्यांना भरारी देणे ऐवजी उलट त्यांना उद्देशून असे विधान केले गेले की,घरी बसून सोशल मीडियावर आपले फ़ोटो व्हायलर करून उमेदवारी मिळत नसते. तर त्यासाठी रस्त्यावर उतरून प्रत्येक नागरिकांची मणे जिंकावी लागतात.असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने भावी म्हणून घेणाऱ्या पं.समिती,जि.प.सदस्य तथा भावी नगरसेवक तथा नागराध्यक्ष संभाव्य उमेदवारांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले.सदरचा कार्यक्रम पार पडताच सर्वत्र नाराजीचे वातावरण पहावयास मिळाले.त्यातच तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान व त्या बाबत शासनाकडुन मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबतच्या प्रश्नावर या स्नेहमीलन कार्यक्रमात आमदार,महोद्यांकडून
चकार शब्दही न निघाल्यामुळे शेतकरी वर्गातही मोठे नाराजीचे सावट पसरल्याचे दिसून आले.त्यामुळे अनेक शेतकरी वर्गाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचेही दिसून आले.कार्यक्रम संपताच कार्यक्रमाचे चर्चे एवजी आमदार संजना जाधवांच्या व्यक्तव्यचिच सर्वत्र चर्चा रंगल्याचे दिसून आले.