शनिवारी एमजीएममध्ये ‘आकडा’चा प्रयोग
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी दुपारी २:३० वाजता रुक्मिणी सभागृहात ‘आकडा’ या बहुचर्चित एकांकिकेचा प्रयोग सादर होणार आहे.
राजकुमार तांगडे लिखित आणि अभिजीत तांगडे व किशोर जाधव दिग्दर्शित सदर प्रयोगात किशोर जाधव, पवन दशरथ, राघवेंद्र सिंग, सौरभ पवार, पल्लवी बेद्रे, प्राजक्ता मोरे व अभिजीत तांगडे हे एमजीएम विद्यापीठाच्या विविध विभागाचे विद्यार्थी अभिनय करीत आहेत तर ओम बोरसे, सुकन्या केंद्रे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.
या प्रयोगास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके, डॉ.शिव कदम, राजकुमार तांगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या प्रयोगाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, विभागप्रमुख डॉ.राजू सोनवणे, राहुल खरे, सतीश जोगदंड, गौरव ढोले आदींनी केले आहे.
