आगामी येणारे उत्सव शांततेत व उत्साहापूर्ण साजरे करा: बिडकीन पोलीसबिडकीन/प्रतिनिधी/आगामी उत्सवांच्या निमित्ताने पोलीस पाटील मासिक बैठक शनिवारी 29 रोजी बिडकिन पोलिस पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आले. या बैठकीत पोलिस प्रशासनाने उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. मासिक सभेत गुडी पाडवा,रमजान ईद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यासारख्या आगामी सणांविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट न टाकण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी उत्सव शांततेत आणि उत्साहतेने साजरा करण्याचे आणि जातीय सामंजस्य राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने जनतेलाही आवाहन केले.बिडकिन एपीआय निलेश शेळके यांनी मासिक पोलिस पाटील बैठकीला संबोधित केले.
