आदित्य नागलोत याची सॉफ्टबॉल स्पर्धेत निवड
भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत जम्मू कश्मीर सॉफ्टबॉल असो. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत बक्षी स्टेडियम श्रीनगर येथे दिनांक 14 ते 16 एप्रिल 2025 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविभागीय राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील सॉफ्टबॉल बेसबॉल अकॅडमीचा खेळाडू आदित्य नागलोत ह्याची महाराष्ट्र राज्य पुरुषांच्या संघात निवड झाली आहे.
या निवडीबद्दल भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष तथा राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर,उपाध्यक्ष डॉ.फुलचंद सलामपुरे,डॉ.उदय डोंगरे,दीपक रुईकर, विक्रीकर सहाय्यक सागर रूपवते, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, प्रा.गणेश बेटूदे,संतोष आवचार,सचिन बोर्डे, रोहित तूपारे,भिमा मोरे,आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले.