आज जालना येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांची संवाद बैठक
जालना/प्रतिनिधी/ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.श्री.रवींद्र चव्हाण हे दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी 11.00 वा. गोकुळ लॉन्स, हॉटेल गॅलेक्सी, जालना येथे जालना महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी, संचलन समिती, निवडणूक संचलन समिती तसेच शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुखांसी संवाद साधणार आहेत.
या संवाद बैठकीस माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, महानगर निवडणूक प्रमुख व माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, अशोक पांगारकर, विजय कामड, विमलताई आगलावे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या बैठकीस भाजपा प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, मंडळ कार्यकारिणी सदस्य, प्रभागाचे प्रभारी, उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना महानगर च्या वतीने करण्यात आले आहे.
