Homeऔरंगाबादशिधापत्रिकांसाठी आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करा – मनसेची मागणी

शिधापत्रिकांसाठी आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करा – मनसेची मागणी

शिधापत्रिकांसाठी आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करा – मनसेची मागणी

जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्हा पुरवठा विभाग व तहसील कार्यालयातील नवीन शिधापत्रिका तसेच दुरुस्तीची प्रकरणे प्रलंबित ठेवून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. रमेश मिसाळ यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच जिल्हा पुरवठा विभाग व तहसील कार्यालयातील संबंधित संगणक ऑपरेटरची तातडीने बदली करण्यात यावी, अशी ठाम मागणी मनसेचे जालना उपशहर अध्यक्ष श्री. बाळू जवाहरलाल जाधव यांनी केली आहे.

         नवीन शिधापत्रिका व दुरुस्तीच्या अर्जांसाठी आर्थिक व्यवहाराची मागणी होत असल्याच्या तक्रारी असून, पैसे न दिल्यास अर्ज प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या शिध्यापासून वंचित राहावे लागत आहे.

         प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढावेत आणि पात्र लाभार्थ्यांना शिधावाटपाचा लाभ मिळवून द्यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments