इराण कमजोर नाही?
आज आपण पाहतो की देशात सिलेंडरचा तुटवडा आहे. पेट्रोल डिझेलच्या साठ्यावर संक्रात येईल असे दिसत आहे. याला जबाबदार आहे युद्ध. कारण इराण व अमेरिकेचं युद्ध सुरु आहे व आखाती देशामधून येणारं कच्च तेल इराणमार्गे येत असल्यानं सध्या देशातही येवू शकत नाही. म्हणूनच सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. हा तुटवड्याचा मुद्दा तेव्हाच सोडवता येईल. जेव्हा युद्ध थांबेल.
युद्ध हे महाभयंकर विनाशकारी असतं. त्यात अपरिमीत हानी होते. मनुष्यहानी आणि वित्तहानीही होते व त्या नुकसानाचं आपण मोजमाप करु शकत नाही.
महायुद्ध जगात दोन झाली. एक पहिलं महायुद्ध नावानं प्रसिद्ध आहे व दुसरं आहे, द्वितीय महायुद्ध. पहिल्या महायुद्धात जो गट होता. तोच गट दुसऱ्याही महायुद्धात होता. मात्र दुसऱ्या महायुद्धात जास्त विनाशकारी काम झालं. पहिल्या महायुद्धात बिस्मार्कची भुमिका महत्वपुर्ण होती. त्यानं जर्मनीला सशक्त बनवलं होतं. परंतु त्याच्याबद्दल जागतिक स्तरावर संशय निर्माण झाल्यानं व त्याच्या अति महत्वाकांक्षेनं पहिलं महायुद्ध झालं. ज्यात जर्मनीचा पराभव झाला.
जर्मनीचा झालेला पराभव. म्हणतात की जर्मनीचा पराभव घालाच नसता. परंतु तो तेथीलच अधिवाशी असणाऱ्या ज्यू लोकांमुळं झाला. ज्यात ज्यु लोकांना जबाबदार धरलं गेलं. त्याचं कारण आहे, त्यांनी जर्मनीमध्ये राहून शत्रूराष्ट्राला मदत करणं. म्हणतात की ज्यू लोकांनी विविध देशातील सैन्यात सेवा दिली. काही ज्यू नेत्यांनी युद्धाला समर्थन देणारी वक्तव्य केली. त्यातच जर्मनी व ऑस्ट्रिया हंगेरीत ज्यू लोकांना देशद्रोही समजलं गेलं. तसंच त्यांनी शत्रूचे हेर समजण्यात आलं.
ज्यू समुदायाने शत्रू राष्ट्रांना मदत केली. त्यांच्यासाठी शत्रूराष्ट्रांनी स्वतंत्र राष्ट्रीय गृह स्थापन केले. जसे सन १९१७ मध्ये ब्रिटिशांनी बाल्फोरची घोषणा केली. ज्यातून ज्यूसाठी पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र राष्ट्रीय गृह स्थापन झाले. सन १९१९ मध्ये पॅरीसने ज्यू लोकांच्या पॅलेस्टाईन मधील राष्ट्रीय गृहाला समर्थन दिले. त्यानंतर त्यांच्या अधिकारांनाही समर्थन दिले. त्यातच अनेक युरोप खंडातील ज्यूनी शत्रूराष्ट्रांना मदत केल्यानं त्या सर्वांना पॅलेस्टाईनध्ये अधिवासासाठी स्थान देण्यात आलं. काही दिवस जाताच ज्यू लोकं हे पॅलेस्टाईनमध्ये स्थायीक झाले व त्यांनी आपल्यासाठी स्वतंत्र भुमी मागीतली. त्यातच इस्रायल हे राष्ट्र बनलं.
पॅलेस्टाईनचा तो भाग. ज्या भागात जेरुसलेम होतं. तशी ही एक बंजर भुमी. ज्यात पाण्याचा अंश नव्हता. ज्यू नी तिथं शरण घेताच त्यांनी त्या जागेत नंदनवन फुलवलं. मग काही काळानंतर त्यांनी स्वतंत्र भुमी मागीतली व ते इस्रायल नावानं स्वतंत्र झालं. त्यातच भुमी कमी पडत असल्यानं त्यांनी हळूहळू लगतच्या प्रदेशातील सीमा हिसकावून घेणं सुरु केलं. मग वाद निर्माण झाला. आता इराणला वाटायला लागलं की ही आमची अधिस्थापीत असलेली भुमी. ज्यात आम्ही दया घेवून त्यांना राहायला जागा दिली. पुढं तेच सक्षम झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र भुमी मागितली. आम्ही तिही दिली. असे असतांना ज्यू ने महत्वाकांक्षा सोडून शांत बसावं. परंतु ते बसत नसल्यानं वाद. तो अंतर्गत वाद इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधील. ज्यात अमेरिका आणि इराण कुदलं. तसा वाद शांततेतच सुरु होता. अशातच इराणच्या काही लष्करी तळावर हमला झाला व ते तळ नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. चौकशी केली असता त्यात इस्रायलचाच हात असल्याचा खुलासा झाला. मग काय, त्याला प्रत्युत्तर म्हणून युद्ध. ज्या युद्धात अमेरिका उतरली व त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या केली. वाटलं की त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची हत्या करताच इराणमधील लोकं नवीन राष्ट्राध्यक्ष बसवतील व तो राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला दबेल वा मदतीचं आव्हान करेल. मग काय, इराणमध्येही आपला दबाव निर्माण होईल. परंतु घडलं उलट. जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धानंतर जो प्रकार घडला. तोच प्रकार इथंही घडला. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत आलेल्या हिटलरने लोकांमध्ये अशी महत्वाकांक्षा भरली की ते त्याला देवच मानू लागले. तोच जर्मनीला गतवैभव प्राप्त करुन देवू शकतो. असं मानण्यात येवू लागलं. त्यातच हे करण्याच्या नादात त्यानं जे ज्यू तेथून पॅलेस्टाईनला पळून जावू शकले नाही. त्या संपुर्ण ज्यूवर त्यांनाच पहिल्या महायुद्धातील पराभवाचे दोषी मानून महाभयंकर अत्याचार केला. ज्यातील अंदाजे सहा दशलक्ष ज्यूंची त्यानं हत्या केली.
महत्वाकांक्षा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हीच महत्वाकांक्षा दाखवून इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेबाबत कंबर कसली. त्यातच न हारता व इराणच्या जनतेला न डगमगू देता संघर्ष सुरु आहे व इराणची जनताही त्यांच्या बाजूला आहे. आता पाहायचे आहे की इराण हा अमेरिकेसमोर झुकतो की अमेरिकेलाच शरणागती पत्करावी लागते ते.
महत्वपुर्ण बाब ही विचारात घेण्यालायक आहे की सध्याच्या काळात कोणीच कमजोर नाही. मग तो गरीब वा श्रीमंत का असेना. साधी मुंगीही हत्तीला नेस्तनाबूत करु शकते. कारण हा काळच कलियुगाचा आहे. या काळात कोण केव्हा शिरजोर होईल ते काही सांगता येत नाही. तेव्हा अमेरिका जरी स्वतःला इराणपेक्षा श्रेष्ठ समजत असेल तरी त्यानं लक्षात घ्यावे की इराणही तेवढा कमजोर नाही. अमेरिकेची निर्मीती होवून जास्त काळ झाला नाही. परंतु इराण. इराण आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यानं बरीच युद्ध पाहिलेली आहेत. जेवढी अमेरिकेनं नाही. त्याला प्रदिर्घ स्वरुपाचा अनुभव आहे. जेवढा अमेरिकेला नाही. पुर्वी याच इराणमधील लोकं अनेक देशांशी व्यापार करीत होते.
इराणचा असलेला समृद्ध इतिहास…… त्याचे दाखवायचे दात वेगळे व खायचे वेगळे आहेत. तो फक्त आता अमेरिकेला खेळवत आहे. ज्या दिवशी इराणला वाटेल की आता पाणी डोक्यावरुन जात आहे. तेव्हा इराण अशी खेळी खेळेल. ज्यातून अमेरिका ध्वस्त होवू शकतो. हे तेवढंच खरं. तेव्हा अमेरिकेनंही याच बाबींचा विचार करावा व युद्ध थांबवावं. तसा अमेरिकाही हुशारच देश आहे. तो समजदार देश आहे. त्यानं समजून घ्याव्यात या गोष्टी व युद्ध समाप्त करावं कायमचं. जेणेकरुन जगात शांती व अमन निर्माण होईल. जग शांततेनं वागेल. त्यातच कोणत्याच बाबींचा जगात तुटवडा निर्माण होणार नाही. हे तेवढंच खरं.
-अंकुश शिंगाडे