फ्रेंडशिप की विश्वासघात
फ्रेंडशिप डे…..लोकांच्या मनोरंजनाचं साधन.या फ्रेंडशिपदिनाचा मित्राच्या भाषेत विचार केल्यास आज या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.अलिकडे लोकं खुप मैत्री करतात.जणू मैत्रीची फँशनच आली असावी.मग या फ्रेंडशिपला पुढे पाय फुटल्यागत या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होते.याच प्रेमाचं रुपांतर पुढे जावून वासनेत.एकदा का वासना पुर्ण झाली की बस……पायातील चप्पल जशी जुनी झाल्यावर बदलवतो.तशी मैत्रीनही लोकं बदलवतात.तिलाही मित्र बदलविणे आवडते,त्यालाही मैत्रीण बदलविणे आवडते.
सध्या फँशनचा काळ.मैत्रीच्या नावावर लोकांनी नंगा तमाशा लावला आहे.मग एखाद्या फुलागत आपला सुवास सोडून आपल्या मित्राला जसं फुल आकर्षीत करतं, अगदी त्याच प्रकारे चांगले भडक कपडे घालणे,लिपस्टीक लावून मित्रांना प्रभावीत करणे हे आजच्या तरुणींचं स्वप्न.त्यातच टपलेले तरुणरुपी भुंगे समाजात काही कमी नाही.तेही या अबोध न कळणा-या मुलींना दिवास्वप्न दाखवून एवढे भाळवतात की ती प्रसंगी आपल्या वडीलांचं ऐकत नाही,पण मित्रांचं ऐकते आणि जेव्हा तिची फसगत होते,तेव्हा तिचे डोळे उघडतात.
या दिनाला फ्रेंडशिप डे म्हणायचं की विश्वासघात दिन हे ओळखतात येत नाही.लोकं मैत्रीचा धागा तर बांधतात.पण त्या धाग्यामागे त्याच्या मनात काय चालत असते.ते आपण ओळखूच शकत नाही.फ्रेंडशिपचे एक उदाहरण देतो.
आमच्या गावाकडे एका घरची मुलगी.मुलगी श्रीमंत होती.मुलगा त्यामानानं कमी श्रीमंत.मैत्री झाली.मग मैत्रीसोबत पुढे प्रेम.त्यातच वडीलांचा विरोध असतांना विवाह.वडीलांची संमती नसतांना विवाह केला.पुढे काय तो विवाह टिकायला हवा होता.पण नाही.वासनेचं काम संपताच मुलाने तिला टार्चर करणे सुरु केले.त्यातच मुलगी आत्महत्या करायला तलावावर गेली.आत्महत्येचे विचार मनात सुरु होते.मुलगी काठावर बसली होती.अशातच एक आजीबाई देवदूतासारखी धावून आली.तिने तिची चौकशी केली.सुरुवातीला ती मुलगी घाबरली.पण आजीबाई मायेच्या ओढीनं बोलू लागताच तिनं घडलेला प्रकार सांगीतला.शेवटी आजीबाईनं तिच्या आईकडील फोननंबर घेवून त्यांना फोन केला व न्यायला बांधील केलं.आज तिला एक मुलगी आहे.पण तिला तो तरुण माहीत करुनही न्यायला आला नाही.
विशेष सांगायचं झाल्यास याला फ्रेंडशिप म्हणायची की विश्वासघात म्हणायचा.कळत नाही.भोळ्या भाबड्या नुकत्याच वयात येणा-या मुली.त्यांनी उन्हाळे पावसाळे झेललेले नसतात.कोणी मार्गदर्शन करणारेही नसतात.अशाचवेळी त्या मैत्रीच्या नावाखाली फसतात.
फ्रेंडशिप करायला हवी.ती करायला मनाई नाही.पण ती विश्वासाला तडा जाईल अशी करु नये.मित्र हे सुखदुःखाचे साथी असतात.ज्या गोष्टी आपण घरी सांगत नाही.त्या गोष्टी आपण मित्रांना सांगतो.मग मित्राने असा विश्वासघात का करावा?
मित्रांमध्ये अनभन होतेच.पण याचा अर्थ असा नाही की मित्रांनी बदला घ्यावा.भांड्याला भांडे लागतेच.जो जास्त जवळचा.तेवढा मनमुटाव जास्त.मग मैत्रीत मनमुटाव येत असेल तर त्याला वाईट समजू नये.मी याबाबतीत एक उदाहरण देतो.एका मित्राची गोष्ट आहे.शालेय जीवनात एकदा माझ्या मित्राला मैत्रीणी होत्या.पण तेवढा जीवलगपणा नव्हता.मायबापानं सांगीतलं होतं की पहिलं आपले ध्येय पुर्ण करायचे.लागन तेवढ्या मैत्रीणी मिळतील.म्हणून तो त्याचं ध्येय पुर्ण करण्याच्या नादात मित्र मैत्रीण पकडत नव्हता.नोकरी लागली.विवाह झाला.साहित्य लेखन सुरु झालं.पण ह्या साहित्यलेखनाला प्रोत्साहन हवे तरच लेखनी पुढे जाते.त्यातच एखाद्या मैत्रीणीने तुमच्या लेखनीला लाईक केल्यास तुमच्या लेखनीत धार येते.अशीच त्यालाही या सारीपाटावर मैत्रीण सापडली.मैत्रीच्या या जगात तो त्याचं ध्येय पाहात होता.तिलाही त्यानं तिचं ध्येय पाहायला लावलं होतं.मैत्री मैत्रीच्या जागी.काही दिवस त्यांच्या बोलण्यातून मनमुटाव आला.बरेच दिवस ती त्याचेशी बोलली नाही.पण चार सहा महिण्यानं ती बोलायला लागली.आता मात्र ती बोलते कधीकधी.जास्त नाही.पण तिच्या बोलण्यातून तो सुखावतो.त्यांच्या लेखनीला धार येते.
मैत्री करा.पण निखळ मैत्री करा.त्यात वासना शिरवू नका.विश्वासाला मित्र माना.विश्वासाला तडा जावू देवू नका.विश्वासाच्या नावावर नंगा तमाशा करु नका.विश्वासघात नकोच नको.मायबापाची सेवा करा.वडीलधा-यांचं ऐका.आपल्या मित्रांची गोष्ट वडीलधा-यांना सांगा.वडीलधा-यांना विश्वासात घ्या.हवं तर वडीलधा-यांना आपल्या मित्रांची ओळख करुन द्या. वडीलधारी जर म्हणत असतील तर ओळख करुन द्या आणि ते म्हणत असतील तरच मैत्री टिकवा.कारण त्यांनी उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात.संकटं झेललेले असतात.मैत्र्या केलेल्या असतात.त्यांना मैत्रीबद्दल जास्त माहीती असते.चांगला फ्रेंड मिळणं यासाठीही नशीब लागतं.ते जर म्हणत नसतील तर तुमच्या मैत्रीला काही अर्थ नाही.हे लक्षात घ्या.शिवाय आपला मित्र जर म्हणत असतील की अमुकाशी मैत्री कर तर ते चुकून करु नका.कारण मैत्रीच्या नावावर आपले मित्रच आपल्याशी विश्वासघात करु शकतात हेही लक्षात असू द्या.
-अंकुश शिंगाडे