Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादविद्रभ साहित्य संघाची निवडणूक 

विद्रभ साहित्य संघाची निवडणूक 

विद्रभ साहित्य संघाची निवडणूक 

         विदर्भ साहित्य संघ. या संघातून बऱ्याच लोकांचं सार्थक झालं. ज्यांचं सार्थक झालं. त्यांचे कॉलर टाईट झाले व ते कॉलर टाईट असल्यागत वागतात. ते इतर लोकांना तुच्छ समजतात. हे बरेच वेळेस दिसून आलं. साधं विदर्भ साहित्य संघामार्फत अखिल भारतीय साहित्य संमेलनात करायला मिळालेलं प्रतिनिधीत्व अशाच काही लोकांची कॉलर टाईट होणारा योग असतो. हेही दिसून येतो व खंत वाटायला लागते की आपण एवढे जुने सदस्य व एवढं लिहिणारे असूनही आपण मागे का राहिलो याची. कारण नव्यांना संधी मिळते आणि जुने सुटत जातात. कधीकधी जे संपर्कात असतात. ते साहित्यीक नसतातच व जे संपर्कात नसतात. तेच साहित्यीक असल्याचं अनुभवायला येत असतं. असं जेव्हा घडतं. तेव्हाच लोकं विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत उभे राहात असतात. यात शंका नाही.*
         आगामी काळात विदर्भ साहित्य संघाची निवडणूक होवू घातलेली आहे व या निवडणुकीत केवळ साहित्यीकच नाही तर गिरीश गांधींच्या रुपानं राजकारणीही उभे आहेत. जे राजकारणाच्या सर्वच दिग्गजांशी अगदी जवळचा संबंध ठेवतात. ज्यांना साहित्याचं कळतं की नाही. हे माहीत नाही. परंतु विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत उभे राहून मीही साहित्यीक आहे असे भासवत आहेत.
           विदर्भ साहित्य संघाची ही निवडणूक आज अगदी प्रतिष्ठेची ठरलेली असून आजपर्यंत बऱ्याच दिवसांपासून तिथं निवडणुकाच झाल्या नाहीत. अगदी सामोपचारानं गड राखला गेला व गडाचे शिलेदार ठरत गेले.
          आजपर्यंत म्हणजेच बरेच दिवसपर्यंत विदर्भ साहित्य संघाची निवडणूक झाली नाही. त्याच्या कारणाचा विचार केल्यास पहिलं कारण समोर येतं. ते म्हणजे कंपू मानसिकता. तिथे असलेले त्यावेळचे अध्यक्ष हे दुरदर्शी स्वभावाचे होते. त्यातच काही अध्यक्ष हे साहित्यीक जरी नसले तरी ते हुकूमत पद्धतीनं वागले. त्यांनी कोणत्याच सदस्यांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार मनानं सदस्यत्व बहाल केलं नव्हतं. केवळ पैशानं सदस्यत्व दिलं होतं. याचाच अर्थ असा की कोणालाच बोलकं होवू दिलं नव्हतं. असा होतो. यावेळेस सर्वच सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचं कारण प्रत्येकांना विद्यमान अध्यक्षांनी बोलकं केलेलं आहे असा होत नाही तर आजपर्यंत त्यांची जी हेळसांड झाली. त्यामुळंच ते बोलके झालेले आहेत व आज ते निवडणुकच्या रिंगणात उभे आहेत. मात्र यावरुन विद्यमान अध्यक्षानं काहीच केलं नाही. असा याचा अर्थ होत नाही. त्यांनीही बऱ्याच सदस्यांच्या गरजा जोपासल्या. त्यांच्या भावना जागवल्या व त्यांना ते कोण आहेत? हे सांगीतलं. हे विसरुन चालणार नाही. विद्यमान अध्यक्षांनी जी उपक्रमं घेतलीत. ती इतर कोणीही घेतलेली नाहीत. यापुर्वी ज्यांनी विदर्भ साहित्य संघ ही एक घरगुती संस्थाच ठेवली.
           सध्याचा काळ हा निवडणुकीचा असून आताच निवडणूक का उभी राहिली? याचं उत्तर आहे राग. बऱ्याच दिवसांपासून राग धुमसत होता. तो राग होता, विदर्भ साहित्य संघाच्या उपक्रमात कोणाला सहभागी करुन न घेणं. त्यांच्या कार्यक्रमांना सन्मानानं न बोलावणं. तसं पाहिल्यास कोणत्याच सदस्यांना ओळखपत्र न देणं. त्यातच एखादा सदस्य तिथं गेल्यास ओळखपत्र नसल्यानं तेथील गाडी स्टँडचे चौकीदारही अरेरावी करत होते. तसंच वर कार्यालयात गेल्यावरही पुरेसा सन्मान मिळत नव्हता. म्हणूनच ही निवडणूक होवू घातलेली आहे. कारण असे बरेचजण आहेत की त्यांना तिथं सन्मानच मिळालेला नाही.
          सन्मान……. अलिकडील काळात लोकं खाणं पिणं पाहात नाहीत. पाहतात केवळ सन्मान. जो सन्मान विदर्भ साहित्य संघाकडून मिळायला हवा. असंही बरेच सदस्य मानतात. त्यावरुन ही निवडणूक. म्हणूनच ती प्रतिष्ठेची ठरलेली आहे.
          विदर्भ साहित्य संघाची निवडणूक जाहीर झाली आहे व त्या निवडणुकीला लोकं उभे राहिलेले आहेत. ते प्रश्न घेवून. पहिला मुद्दा असा की जे कार्यक्रम होतात. ज्या कार्यक्रमांपैकी आतापर्यंत एकाही कार्यक्रमाला ज्यांना सहभागी केलं गेलं नाही. त्यांना न्याय देवू. परंतु हा मुद्दा गौण आहे. कारण सध्याच्या अवस्थेत एवढे सदस्य विदर्भ साहित्य संघाचे सदस्य आहेत की प्रत्येकाला विदर्भ साहित्य संघ कार्यक्रमाला बोलवूच शकत नाही. परंतु ते स्वतः येवू शकतात विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात. त्यांनाही साहित्य दृष्टीनं मनोरंजन हवं असतं. परंतु तरीही ते तिथं येत नाहीत. त्याचं कारण आहे त्यांची ओळख. ते सदस्य असतात. परंतु ओळखपत्र त्यांच्याजवळ नसल्यानं जो पहिल्यावेळेस अपमान होतो. तो अपमान लक्षात घेता पुन्हा तिथं यावंसं वाटत नाही. त्यातच असे अपमानीत झालेले सदस्य पुन्हा तिकडे कोणीही येत नाहीत.
          विद्यमान अवस्थेतील मी अनुभवलेला एक प्रकार मांडतो. मीही विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत फॉम भरावा म्हणून दि. १६ तारखेला गेलो. तेव्हा खालच्या भागात असलेल्या गाडी स्टँडवर गाडी लावली. त्यावेळेस चौकीदाराने म्हटलं,
          “ओ भैया, इधर गाडी लगाने का नही।”
           ते त्याचं म्हणणं. त्यावर मी म्हटलं की साहेब, मी मेंबर आहे विदर्भ साहित्य संघाचा. परंतु त्यावर तो म्हणाला,
          “साहाब, मै मेंबर वेंबर नही जानता, आप पैसे दो। बाद मे बात करो।”
            ते त्याचं बोलणं, त्यावर मी म्हटलं,
          “अगर पैसे नही दिये तो?”
           ते माझं बोलणं. त्यावर तो म्हणाला,
         “मी गाडीच लावू देणार नाही.” त्यावर मी म्हटलं,
          “मला फॉम घ्यायचा आहे, निवडणुकीत उभं राहायचं आहे. फॉम घ्यायला आलोय. मी पैसे देणार नाही.”
           मी तसं म्हणूनही तो जिद्दीवरच होता. त्यामुळंच शेवटी मी म्हटलं,
          “मी फॉम घेवून येतो. त्यानंतर आपणाला पैसे देतो.”
          तो मानला व मी वर जावून फॉम आणला. त्यानंतर त्याला म्हटलं,
          “मी आता फॉम आणलेला आहे. मी तुला पैसे देतो. परंतु इथं जर निवडून आलो ना. तर तुला आधी काढून टाकेल.”
         असं म्हणताच तो नरमला व त्यानं माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. विदर्भ साहित्य संघात हा माझ्यासोबत घडलेला प्रकार. जर मला विदर्भ साहित्य संघानं आजीवन सदस्याचं ओळखपत्र दिलं असतं तर….. तर असा प्रकार माझ्यासोबत घडलाच नसता.
          आज मी सन एकोणविसशे पंच्यानवचा सदस्य आहे व माझ्या एकशे सोळा पुस्तका प्रसिद्ध आहेत. ज्या आजच्या ऑनलाईन काळात माझं किंवा पुस्तकाचं नाव जरी टाकलं तरी गुगलवर उघडतात. परंतु असं मांडणं म्हणजे माझा अहंकार आहे. असे असूनही मला जर तशी वागणूक मिळत असेल साहित्य संघात तर मी का बरं उभा राहू नये निवडणुकीत? असं प्रत्येक सदस्यांसोबत घडत असेलच कोणत्या ना कोणत्या बाबतीत. जे माझ्यासोबत घडलं. मी आज निवडणुकीचा फॉम भरला नाही. पुरेसा थांबलो. कारण निवडणुकीत फॉम भरणारी मंडळी ही आपलीच आहेत. आपल्याच परीवारातील आहेत. अन् परिवारातील मंडळींचं काही थोडंसं चुकतही असेल तर त्यांना माफ करावं लागतं. असा विचार करुन. तेच मी केलं. त्यांना सुधारण्याची संधी द्यावी एकदा म्हणून. कदाचीत मी निवडणुकीत उभा तर राहू शकतो. परंतु निवडून येणार नाही, असा विचार करुन. परंतु ते बाकी लोकांनी केलंलं नाही. ते निवडणुकीत उभे राहिले. आगामी काळात मीही नक्कीच उभा राहील निवडणुकीत. सर्व सदस्यांना ओळखपत्र देण्यासाठी. जर निवडून येणाऱ्या सदस्यांनी सर्व सदस्यांना त्यांची ओळखपत्र दिली नाही तर….
          दुसरा प्रकार होता, तो तेथील एका कर्मचाऱ्यांचा. तो संवाद मांडतो. मी विदर्भ साहित्य संघाचा सदस्य जरी असलो तरी तेथे जुन्या व तेथे कधीच न येणाऱ्या सदस्यानं जर पहिल्यांदाच पाऊल ठेवलं तर त्यांना सन्मान मिळत नाही. जरी मी अमुक अमुक साली सदस्य बनलो व आजीवन सदस्य आहो असे सांगीतले तरी. याआधी तसंच घडलं माझ्यासोबत. म्हणूनच मी फॉम घेतला. परंतु ज्या दिवशी मी फॉम घेतला. त्या दिवशीचा एक संवाद सांगतोय. तसा संवाद होता,
          “फॉम कुणाकडून भरताय?”
          “कुणाकडून म्हणजे?”
          “शोभणेकडून की जोशींकडून.”
           “कुणाहीकडून नाही. वैयक्तिक भरतोय.”
            “तुम्ही काही वैयक्तिक निवडून येणार नाही.”
            “मग भरु नको काय मी फॉम?”
            “मी तसं म्हणत नाही. परंतु खर्च कशाला करताय उगाचाच.”
            “का? मला निवडणुकीत उभे राहायचा अधिकार नाही का विदर्भ साहित्य संघाच्या?”
           “नाही, मी तसं म्हणत नाही. उपाय सांगीतला. विनाकारण खर्च कशाला करताय हाच तो विचार.”
           “का वैयक्तिक उभा राहणारा व्यक्ती निवडणुकीत निवडून येत नाही काय?”
            “नाही येत साहेब, पक्षाचं चिन्हं हवंच.”
           तो तेथील कर्मचाऱ्यासोबत घडलेला संवाद. कदाचीत माझा अवतार पाहून तो कर्मचारी रास्त भावनेनं बोलला असेल. त्याला वाटलं असेल की साहेब वैयक्तिक फॉम भरीत आहेत. निवडून जर नाही आले तर पैसे उगाचच वाया जातील. साहेबांचे पैसे उगाचंच कशाला वाया जावू द्यायचे. कारण यापुर्वीच्या ज्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुका झाल्यात. त्या निवडणुकीत मतदान करायचे बॅलेट पेपरच मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. मला तर आजपर्यंत अजुनही आले नाहीत. मी उभं राहिल्यावर असंच घडलं तर….. मी कसा निवडून येणार. हे त्याला माहीत असणार. म्हणूनच तो बोलला. तसं पाहिल्यास विदर्भ साहित्य संघांचं नाव साहित्यावरुन आहे व कार्यही साहित्याचं आहे. परंतु संधी साहित्यीकांना मिळतांना दिसत नाही. मला आजपर्यंत विदर्भ साहित्य संघात कोणत्याच स्वरुपाची संधी मिळालेली नाही. हेही इतरही बर्‍याच सदस्यांबरोबर घडत असेलच.
          महत्वाचं सांगायचं झाल्यास आज विदर्भ साहित्य संघ लहानशा रोपट्यावरुन विशाल महाकाय वृक्ष बनलेला आहे. एकशे तीन वर्षाची विदर्भ साहित्य संघाला परंपरा लाभलेली आहे. अशावेळेस विदर्भ साहित्य संघाच्या सदस्यात, ती साहित्य संस्था असून व ती साहित्याशी निगडीत असूनही ज्यांची काहीच पुस्तके प्रसिद्ध नाहीत. असेही लोकं आहेत. ते फक्त साहित्यीकरण वेगळं व राजकारण जास्त खेळत असतात. मध्यतंरीच्या काळात अखिल भारतीय साहित्य संमेलनात नाव हवं ना. मग एवढे एवढे रुपये द्या. अशी हूक उडवली होती. ज्यात ज्या लोकांनी दिले असेल. त्यांची वर्णी लागलेली असेलच. कारण बरीचशी तशाच स्वरुपाची नावं दिसतात कधीकधी पत्रिकेतून. परंतु असं जरी आजपर्यंत घडलं असेल तरी तो गतकाळ होता. भुतकाळ, भुतकाळ असतो. तो काळ परत येत नाही. परंतु आगामी काळात असं होवू नये. आगामी काळात प्रत्येक सदस्याला सन्मान मिळायलाच हवा. मग तो सदस्य नवीन असो की जुना. सदस्य हे आपल्याला चहा मागत नाहीत. पाणीही मागत नाहीत. फक्त आपलं गोड बोलणं मागतात. तोच सन्मान असतो. आपल्या विचारानं त्यांचा सन्मान करावा. जेणेकरुन त्यांनाही चांगलं वाटायला हवं. तसंच असंही वाटायला हवं की तो विदर्भ साहित्य संघाचा सदस्य बनल्यानं त्याचं सार्थक झालं. जे इतर संस्थेतून झालेलं नाही. शिवाय विशेष म्हणजे ओळखपत्र दिलीत तर फारच बरं. जेणेकरुन गाडी स्टँडवर मागितलं जाणारं गाडी स्टँडचं शुल्क तरी माफ होईल. हे तेवढंच खरं.
-अंकुश शिंगाडे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments