Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादबिबट्या आला रे आला?

बिबट्या आला रे आला?

बिबट्या आला रे आला?

         सध्या महाराष्ट्रात जिकडेतिकडे बिबट्या प्रकरण गाजत आहे. तसं पाहिल्यास बिबट्यानं सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे व आता बिबट्या विधानसभेतही शिरला आहे व प्रत्येकजण म्हणत आहे की बिबट्या आला रे आला. अन् तसं म्हणणं चुकीचंही नाही. कारण बिबट्या लोकांना दिसत आहे आणि तो लोकांवर हल्लेही करीत आहे.
        बिबट्या वस्तीत आला. त्याने वस्तीत धुमाकूळ घातला. त्यानं माणसांवर हल्ला केला. त्यानं माणसं मारली. हे सारच बरोबर आहे. परंतु तो वस्तीत का आला? यावर विचार केल्यास असं जाणवतं की त्याच्या अधिवासाची जंगलं नष्ट झाली. कोणी केली तर ती मानवानं केली. कोणत्या मानवानं केली? जो त्या जंगलाच्या परिसरात राहतो, त्या माणसानं की जो तिथं राहात नाही, त्या माणसानं. अर्थातच जो त्या जंगलाजवळ राहात नाही, त्या माणसानं जंगलं नष्ट केलीत. अर्थातच तो जंगल नष्ट करणारा माणूस हा एखादा कंत्राटदार असतो की तो त्या जंगलाच्या गावाजवळ राहात नाही. तो जंगल नष्ट करतो, आपल्या स्वार्थासाठी. कारण त्याला त्या जंगलातील लाकूड विकून व्यापार करायचा असतो. एवढंच नाही तर ते जंगल नष्ट करायला कारणीभूत असतो त्या भागातील मंत्री. ज्याला त्या जंगलातील लाकडापासून मिळणाऱ्या पैशातून कमीशन मिळत असतं. मात्र जंगल नष्ट ज्या भागातील होतं. त्या माणसांना त्या जंगलकटाईपासून नुकसानच होत असतं.
          जंगलं ही सृष्टीची नैसर्गिक देण आहे. सृष्टीनं निर्माण केलेली वनसंपदा अर्थातच वन्यजीव सुरक्षीत राहावेत. म्हणूनच निसर्ग व सृष्टी निर्माण करतांना विधात्यानं जंगलं निर्माण केली. परंतु जर माणूस त्यात कुत्रीमता आणत असेल आणि जंगलं नष्ट करीत असेल तर सृष्टी ही ते जंगल नष्ट करणाऱ्यांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे विनाश करेलच. जे बिबट्याच्या आगमनानं कळून येत आहे.
         परीवर्तन ही काळाची गरज आहे. याबाबतीत विचार केल्यास जंगल नष्ट होणारच. ते मानव नष्ट करणारच. कारण त्याचा त्यात स्वार्थ आहे. अन् त्याची झळ ज्याचा त्यात दोष नाही, त्यालाही पोहोचणारच. मग त्यात त्याचा दोष नसला तरी निसर्ग ते पाहात नाही वा सृष्टीनिर्माता ते पाहात नाही. सृष्टीनिर्माता हेच पाहतो की जरी त्याचा दोष नसेल तरी तो एक मानव आहे. तसं माणसाचंही चुकतंच.
         माणूस हा एक अती सृष्टीतील हुशार घटक. त्यानं सृष्टीतील वेगवेगळ्या घटकांवर नियंत्रण मिळवलंय. ज्यात त्यानं आता दगडालाही जीव फोडलाय, असं म्हणायला काहीही हरकत नाही. त्यानं पृथ्वीच्या गर्भात कितीतरी दूरपर्यंत शिरुन पृथ्वीचा अभ्यास केलाय. त्यानं आकाशात कितीतरी दूरवर जावून आकाशाचा अभ्यास केलाय. त्यानं कितीतरी अजस्र प्राण्यांवर ताबा मिळवून त्यांना नियंत्रणात आणलंय. परंतु हे जरी खरं असलं तरी तो संबंध सृष्टीला नियंत्रणात आणू शकत नाही. त्याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हा वस्तीत येणारा बिबट्या. निसर्ग या माध्यमातून सांगतोय की तुम्ही मानव अती हुशारही असाल, तरी मला नियंत्रणात आणू शकत नाही. अन् तसा प्रयत्न जरी केला तर मी तुम्हालाच नष्ट करुन टाकीन. हवाही लागू देणार नाही. हाच निसर्गाचा विचार. म्हणूनच निसर्ग कधी कोरोना रुपानं तर कधी बिबट्या रुपानं, कधी भुस्खलन रुपानं तर कधी पूर रुपानं, कधी शेतीचं नुकसान तर कधी भुकंप. या सर्वच प्रकारानं नुकसान करीत असतो. आपणच निसर्गाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्यानं व त्यांचेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करीत असल्यानं निसर्ग आपल्याशी छेडछाड करतो. तो स्वतः येत नाही आपली छेडछाड करायला. परंतु माध्यम मात्र पाठवून देत असतो. ज्यात मानवाला नष्ट करण्याचं माध्यम कधी एखादा आजार ठरतो तर कधी एखादी आपत्ती. ज्यातून मानव नष्ट होतो.
         महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की आपण निसर्गावर अंमल करु शकत नाही. आपण निसर्गातील वस्तू ऑष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास निसर्गही काही काळानं आपला चमत्कार दाखवतोच. ज्यात बिबट येण्यासारख्याही घटना घडतातच. हा फक्त ट्रेलर आहे, बिबट्या आला रे आला या निसर्गाच्या चित्रपट निर्माण करणाऱ्या घटनेचा. निसर्ग जेव्हा खरा चित्रपट निर्माण करेल ना. तेव्हा मात्र विचार करायला सवडही मिळणार नाही. असं असतांना निसर्गातील अस्तित्वात असलेल्या वस्तू का नष्ट कराव्यात? त्याही करु नये म्हणजे झालं. विचार करायला हवा की आज आपण जंगलं नष्ट केली व भरपूर पैसे कमवलेही. आपल्याला लाभही झाला. तरीही उद्याला येणारी आपलीच पिढी आपल्याला माफ करणार नाही. ती कोसत राहील. कारण आज बिबट्या मानवी वस्तीत फिरत आहे. उद्या बिबट्यासारखे कितीतरी हिंसक प्राणी मानवी वस्तीत फिरतील. बिबट्या वस्तीत येणं त्याचंच उदाहरण. शिवाय बिबट्या असा प्राणी की जो झाडावर, पाण्यात, घरात, शहरात कुठेही राहू शकतो. तोच पुढं सर्वेसर्वा असेल. तोच आपलं अधिराज्य गाजवू शकेल मानवी वस्तीत. अन् मानवाला अहोराज्य असेल मानवी वस्तीत. त्यातच मानवाला पळायला भुईही सापडणार नाही.
-अंकुश शिंगाडे 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments