Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबाद्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांच मतदान करणार

्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांच मतदान करणार

्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्यांच मतदान करणार

व्यापारी महासंघाने जाहीर केली भूमिका, प्रसिद्धीस दिले विविध मागण््यांचे निवेदन
जालना :- शहर व जिल्ह्यातील वीस हजार व्यापाऱ्यांचे प्रतिनिधत्व करणाऱ्या जालना जिल्हा व्यापारी  महासंघाने महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त जो पक्ष किंवा उमेदवार शहराच्या विकासासाठी व व्यापारी वर्गाच्या हितासाठी व्यापारी महासंघाने केलेल्या मागण्याचे आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट उल्लेख करेल. त्या पक्षाच्या किंवा उमेदवाराचा व्यापारी वर्ग मतदानासाठी विचार करेल अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
सध्या महानगरपालिका क्षेत्रात आस्थापना करास स्थगिती आहे पण तो पूर्णपणे रद्द करण्यात यावा. शहरातील नागरिक आपली मालमत्ता भाडेतत्त्वावर दिल्यानंतर येणाऱ्या किरायावर महानगरपालिका जवळपास ५०% टॅक्स आकारत असल्यामुळे येथे कार्पोरेट क्षेत्रातील ऑफिसेस किराया वरील मालमत्ता कर जास्त असल्यामुळे जालना शहराची निवड करत नाही.  किरायाने देणाऱ्या मालमत्तेवर महानगरपालिकेचा कर जास्त असल्यामुळे कोणीही आपली खाजगी मालमत्ता भाड्याने देण्यात तयार होत नाही त्यामुळे शहराची  प्रगतीस खिळ बसत आहे.  हा टॅक्स रद्द करून  कमर्शियल प्रॉपर्टीच्या दराने किंवा कार्पेट एरिया मोजून घेण्यात यावा . ऑनलाइन मार्केटिंग मुळे छोटे-मोठे व्यापारी मेटाकुटीस आलेले आहे. त्यांचे मार्जिन खूप घटले आहे. ते आपला व्यवसाय टिकवून  ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. तीनशे स्क्वेअर फूट पर्यंत दुकान असणाऱ्यां अशा व्यापाऱ्यांच्या आस्थापनास मालमत्ता करातून  संपूर्ण सूट देण्यात यावी. दुकानासमोर उभ्या राहत असलेल्या अधिकृत व अनाधिकृत हातगाड्यां मुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या जागेवर स्पेशल हॉकर झोन निर्माण करून तेथे हातगाड्यांना व्यापार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. महापालिकेचा शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या फुले मार्केटचे काम महापौराची निवड झाल्यानंतर त्वरित करण्यात यावे व तेथे पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. शहरातील बाजारपेठेत स्वच्छताघर किंवा फिरते स्वच्छताघराची व्यवस्था करावी. महानगरपालिकेचा कारभार सर्व ऑनलाईन करण्यात यावा व कुठलीही काम पूर्ण करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन देण्यात यावे. शहरातील नागरिकांसाठी साठी महापालिका क्षेत्रात कुठलेही अद्यावत उद्यान नाही महानगरपालिका वृक्ष कर घेते मग उद्यान का डेव्हलप करत नाही? त शहरातील सर्व उद्यानावर असलेले अतिक्रमण काढून ते विकसित करावे. शहर स्वच्छतेबाबत मानांकात फारच मागे आहे. कचरा गाड्याची व्यवस्थापन व शहरातील स्वच्छतेबाबतचे व्यवस्थापन अद्ययावत पद्धतीने करण्यासाठी एखादी नवीन सिस्टीम इस्टॅब्लिश करावी, आदी मागण्या व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments