” 69 वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धां 2025-26 “
वेटलिफ्टींगमध्ये महाराष्ट्राची घोडदौड सुरू
महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, भारतीय खेळ महासंघ अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 69वी राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग (19 वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धां 2025-26 चे आयोजन दिनांक 5 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये विभागीय क्रीडा संकुल, छत्रपती संभाजीनगर येथे आहेत.
दिनांक 7/1/2026 रोजी झालेल्या खेळातील खेळाडूंना राज्य संघटनेच्या पदाधिकारी यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. मा.श्री. बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर, मा.श्री. नटवरसिंग,एस.जी.एफ.आय. निरीक्षक, मा.श्री. प्रदिप चोळकर,स्पर्धा निरीक्षक, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, श्री. प्रदिप पाटील, राजेश कामटे, तृप्ती पाराशर, आंतरराष्ट्रीय वेटलिफटींग प्रशिक्षक, महाराष्ट्र संघाच्या 19 वर्षे मुलीचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून श्रीमती उज्वला माने,मुलेसाठी श्री. संकेत सरगर व संघव्यवस्थापक म्हणून श्री. रामकिशन मायंदे, क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, वेटलिफ्टींग खेळाचे राष्ट्रीय पंच अधिकारी तसेच भारतातील सर्व राज्यातील उत्कृष्ठ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक उपस्थित होते.
स्पर्धेतील सामन्याची तांत्रिक बाजू महाराष्ट्रातील राज्य वेटलिफटींग संघटना सांभाळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध राष्ट्रीय पंच परीक्षा पात्र पंच व तांत्रिक अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विविध शाळा व क. महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी व स्पर्धा संघटनांचे अधिकारी यांचे सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहे. सदर कालावधीत स्पर्धा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी, क्रीडा प्रेमी व नागरीकांनी उपस्थित राहावे असे श्री. बाजीराव देसाई, जिल्हा क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
