Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादफुलंब्रीत  दोन दिवसीय तब्लिगी इज्तेमा उत्साहात संपन्न 

फुलंब्रीत  दोन दिवसीय तब्लिगी इज्तेमा उत्साहात संपन्न 

फुलंब्रीत  दोन दिवसीय तब्लिगी इज्तेमा उत्साहात संपन्न 

फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय तब्लिगी इज्तेमा शुक्रवारी रात्री ९ वाजता सामूहिक प्रार्थनेने शांततेत. व उत्साहात संपन्न झाला. या इज्तेमामध्ये तालुक्यासह फुलंब्री परिसरातील सुमारे १५ हजार मुस्लिम भाविकांनी सहभाग नोंदविला.
फुलंब्री तालुका तब्लिगी जमातच्या वतीने आयोजित या इज्तेमामध्ये
१५ हजार मुस्लिम भाविक इज्तेमास उपस्थित होते.
आणि समाजजीवन यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. इज्तेमाची सुरुवात १ जानेवारी रोजी सकाळी नमाजनंतर झाली. त्यानंतर दिवसभर विविध वेळेला नमाज, धार्मिक प्रवचने, तसेच मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडले. सायंकाळी साडेपाच वाजता व रात्री सात वाजता नमाजनंतर झालेल्या प्रवचनांमधून इस्लाम धर्मातील आचार-विचार, नैतिकता, शिस्त, संयम, सदाचार, सामाजिक बांधिलकी तसेच समाजात शांतता व बंधुता टिकवण्याचा
संदेश देण्यात आला.
इज्तेमाच्या समारोप प्रसंगी औरंगाबाद जिल्हा अमीर जमातचे जिल्हाध्यक्ष मौलाना शमशोद्दीन यांनी अंतिम प्रवचन केले. त्यानंतर देशात शांतता नांदावी, सर्व धर्मीयांनी गुण्यागोविंदाने नांदावे, समाजात सौहार्द, सलोखा व परस्पर आदरभाव टिकून राहावा, यासाठी विशेष सामूहिक प्रार्थना (दुआ) करण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments