Wednesday, April 1, 2026
Homeऔरंगाबादबोधी दिन: मानवजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग

बोधी दिन: मानवजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग

बोधी दिन: मानवजागृती आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग

 

जगाच्या इतिहासात काही दिवस फक्त प्रसंग म्हणून नाही तर बदलांचे बिंदू म्हणून ओळखले जातात. अशा दिवसांपैकी एक म्हणजे ८ डिसेंबर बोधी दिन होयहा दिवस केवळ बौद्ध धर्मीयांसाठी अध्यात्मिक महत्त्वाचा नाहीतर संपूर्ण मानवजातीसाठी विचारविवेककरुणा आणि सामाजिक न्यायाची स्मृती जागवणारा दिवस आहे. कारण याच दिवशी राजकुमार सिद्धार्थांनी बोधी वृक्षाखाली ध्यानधारणा करत करत जीवनातील अनंत दुःखविषमतायुद्धसत्तालोभ व अन्यायाच्या संकटांचे मूळ शोधत अखेर ज्ञानप्राप्ती केली आणि ते गौतम बुद्ध झाले. म्हणूनच बोधी दिन ही केवळ धार्मिक घटना नाहीतर मानवजातीच्या सामाजिकनैतिकतत्त्वज्ञानिक आणि मानवतावादी प्रवासातील एक अविस्मरणीय मैलाचा दगड आहे.

मानव समाजाच्या उत्क्रांतीत अनेकदा युद्धांनीएकाधिकारशाहीनेसाम्राज्यवादाने आणि सामाजिक जात-धर्म-वंशभेदांनी दहशत निर्माण केली. आपल्याला प्रश्न असा पडतो की मानवाला मानव बनविणारा मार्ग कोणताशक्तीचा की प्रज्ञेचा? तर बुद्धांचे उत्तर होते की शांततेचानैतिकतेचाकरुणेचासमानतेचा आणि मध्यममार्गाचाम्हणूनच समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता बोधी दिन हा केवळ आध्यात्मिक ज्ञानाचा उत्सव नाही तर मानवी समाजाला न्याय्यसमतामूलक आणि नैतिक दिशेने प्रवास करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

इतिहासात पाहिल्यासज्ञानप्राप्तीपूर्वीचा सिद्धार्थ हा केवळ एखाद्या राज्यातील राजकुमार नव्हतातो एक संवेदनशील निरीक्षक होता. मृत्यूरोगवृध्दत्व आणि दारिद्र्य या चार सत्यांनी त्याला हादरवले. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून हे प्रश्न आजही तेवढेच जिवंत आहेत. जग प्रगत झाले असे म्हणवले जातेपण भूकयुद्धसामाजिक असमानतामानसिक तणावजातीय संघर्षधार्मिक कट्टरता आणि उपभोगवाद-नफा-आधारित जीवनपद्धतीने मानवाला पुन्हा असहाय्य बनवले आहे. अशा काळात बोधी दिनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

गौतम बुद्धांच्या शिकवणीत धम्म हा कर्तव्यनैतिकता आणि विवेक होता. त्यामुळे धम्म म्हणजे कर्मकांडजप-तपपुरोहिती किंवा अंधश्रद्धा नव्हेतर समाजाला समता आणि न्याय मिळवून देणारी प्रेरणा. म्हणूनच बुद्ध म्हणतात की अप्प दीपो भव” म्हणजेच स्वतःचा दीप स्वतः बना. समाजशास्त्रीय अर्थ असा कीप्रत्येक व्यक्तीने आत्मबोधविचारमंथन आणि नैतिक धैर्य विकसित केले पाहिजेकारण परिवर्तन हे बाहेरून लादले जाणारे नसते तर ते अंतर्मनातून जन्मते.

बोधी दिन मानव स्वभावातील तीन प्रमुख प्रवृत्तींकडे निर्देश करतो,  त्यामध्ये पहिली प्रवृत्ती म्हणजे लोभ म्हणजेच अत्यंत मिळवण्याची इच्छा होय. आधुनिक समाजशास्त्र सांगते की बाजारव्यवस्था भौतिक समाधान देऊ शकतेपण ती आध्यात्मिक आणि भावनिक शांती देऊ शकत नाही. दुसरी प्रवृत्ती आहे द्वेष होय. आजही आपण पाहतो की राजकारणातधर्मांमध्येसमाजवर्गांमध्येडिजिटल माध्यमात आणि राष्ट्रांमध्ये लोकांमध्ये मतभेदांपेक्षा तिरस्कार वाढत आहे. बुद्ध म्हणतात की द्वेषाने द्वेष संपत नाहीप्रेमानेच तो संपतो. तिसरी प्रवृत्ती म्हणजे अज्ञान होय. दडपशाहीभेदभावहिंसा आणि कट्टरतेचा मूलाधार. समाजातील अन्यायजातीय दमनपितृसत्तावर्ण-जातिवादआर्थिक शोषणपर्यावरणाचा विनाश यांची मुळे मानवी अज्ञानात आणि अविचारी कृतीत आहेत. बोधी म्हणजे हे अज्ञान दूर करण्याची प्रक्रिया होय.

म्हणूनच बोधी दिन मानवाला स्मरण करून देतो की ज्ञान म्हणजे माहिती नव्हेतर जागृती. आज इंटरनेटकृत्रिम बुद्धिमत्ताजागतिकीकरण आणि डिजिटल संपर्कामुळे माहितीचे जग फुलले आहेपण शांतीश्रद्धामानवता आणि संयम कोठेतरी हरवले आहेत. म्हणूनच बुद्धांचे तत्त्वज्ञान समाजशास्त्रीय प्रश्न विचारते की आपण अधिक प्रगत झालो आहोतकी फक्त अधिक गुंतागुंतीचे आणि अस्थिर झालोआहोत?

बोधी दिन आपल्याला न्यायाच्यासमतेच्यासंवादाच्या आणि अहिंसेच्या नव्या मूल्यांना स्वीकारण्याचे आह्वान देतो. बुद्धांनी लोकशाहीचा पाया मांडताना संघविचारस्वातंत्र्यमतभेदांचा सन्मान आणि सार्वत्रिक करुणा या तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवले. आजच्या लोकशाही व्यवस्थेत या मूल्यांची पुन्हा गरज भासते. कारण विचारविनिमयाऐवजी संघर्षसहिष्णुतेऐवजी कट्टरता आणि मानवी हक्कांऐवजी नियंत्रणवाद वाढताना दिसतो आहे. म्हणूनच बोधी दिन आपल्याला सांगतो की समाजाची उभारणी वर्चस्वावर नाहीतर सहजीवनावर होते.

याच संदर्भात बुद्धांनी समाजातील सर्वात उपेक्षित घटक म्हणजेच महिलाशूद्रवंचितसंघर्षग्रस्त आणि पीडित घटकांमध्ये मानवी समानतेचे तत्त्व पहिल्यांदा प्रत्यक्षात आणले. समाजातील प्रत्येक जण जातलिंगवर्गधर्मव्यवसाय किंवा जन्माच्या आधारे समान आहे हे तत्त्व सामाजिक न्यायासाठी आजही महत्त्वाचे आहे.

बोधी दिन हा वर्तमानातील मानसिक आरोग्याच्या संकटांनाही उत्तर देतो. आधुनिक जीवनशैली वेगवानस्पर्धात्मकतणावग्रस्त आणि यांत्रिक झाली आहे. बुद्धांचे ध्यानसम्यक स्मृतीमन:शांतता आणि प्रज्ञेचे तत्त्व आज जागतिक मानसिक आरोग्य चळवळीचे आधार आहे. जागरूकताध्यानभावनिक बुद्धिमत्ता (mindfulness, meditation, emotional intelligence) यांचा उगम हा बोधीच्या तत्त्वज्ञानातच आहे.

बोधी दिन आपल्याला पर्यावरणीय जाणीव देखील शिकवतो. बुद्धांनी निसर्गासोबत संघर्ष नव्हेतर सह-अस्तित्व सुचवले. आज पृथ्वीला हवामान बदलप्रदूषणजैवविविधतेचा ऱ्हासनद्यांचा मृत्यूजंगलांचा विनाश आणि प्राणी-मानव संघर्ष या समस्या भेडसावत आहेत. अशावेळी “सर्व प्राणी माझेच आहेत” हा बुद्धांचा संदेश आजच्या पर्यावरणीय नैतिकतेचा मूळ पाया ठरतो. याच अर्थाने बोधी दिन हा केवळ स्मरणदिन नाही तर तो सततच्या आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. बुद्धांनी सांगितले की मनुष्याचे दुःख भाग्याने नव्हेतर त्याच्या विचारांनी आणि कृतींनी निर्माण होते. म्हणून बदल हवा असेल तर तो आतून सुरू झाला पाहिजे.

आजच्या काळात बोधी दिनाचा संदेश जगभराला एका नव्या सामाजिक कराराची गरज सांगतो तो संदेश म्हणजेजिथे धर्म हिंसा नव्हेसंवाद निर्माण करतो. जिथे तंत्रज्ञान मानवतेची परिपूर्ती करतो. जिथे समीक्षाशील विचार आणि करुणा एकत्र येतात. जिथे समाज फक्त विकसित नसतोतर मनानेही सभ्य असतो. या अर्थाने बोधी ही स्वतःमध्ये एक अंतरिक क्रांती आहे. ती जीवनाच्या संघर्षांना टाळणारी नाहीतर त्या संघर्षांचे स्वरूप समजून शांततेने त्यावर उत्तर शोधणारी आहे. बोधी दिन ही एक जाणीव आहे की जग बदलण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे स्वतःला बदलणे होय.

आज ८ डिसेंबरच्या या दिवशी आपण सर्वांनी स्वतःला विचारावे की आपण जागृत आहोत की फक्त जागे आहोत?”
कारण बुद्धांच्या मते, मनुष्य जन्माला येतोपण मानव बनण्यासाठी त्याला विवेककरुणादया आणि समता अंगीकारावी लागते. बोधी दिन आपल्याला एकच संदेश देतो कीशांती ही बाह्य मिळकत नाहीती अंतर्मनातून उगम पावलेली प्रज्ञा आहे. आणि हीच प्रज्ञा समाजाला न्याय्यसमतामूलकशोषणमुक्त आणि सौहार्दपूर्ण बनवू शकते. म्हणून आजच्या या पवित्र दिवशी आपण फक्त स्मरण नव्हे तर अनुकरण करण्याचा संकल्प करूया. कारण जेव्हा प्रत्येक मानव बोधी होईलतेव्हा जगात खऱ्या अर्थाने सुंदरताशांती आणि मानवता नांदेल.

-डॉ. राजेंद्र बगाटे 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments