Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमाणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे बी सावंत हायस्कूल पन्हळघर येथे उत्साहात संपन्न

माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे बी सावंत हायस्कूल पन्हळघर येथे उत्साहात संपन्न

माणगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे बी सावंत हायस्कूल पन्हळघर येथे उत्साहात संपन्न
बोरघर/माणगाव/ शिक्षण विभाग पंचायत समिती माणगाव, पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे, माणगाव  तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जे बी सावंत हायस्कूल पन्हाळघर लोणेरे  येथे दिनांक १ डिसेंबर आणि २ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले.  विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास माणगाव तालुका गटविकास अधिकारी  शुभदा पाटील पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ कार्याध्यक्ष नानासाहेब सावंत, जे बी सावंत विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत, माणगाव तालुका माणगाव तालुका गटशिक्षणाधिकारी माननीय सुरेखा तांबट, लोणेरे ग्राम पंचायत सरपंच माननीय प्रकाश टेंबे, जे बी सावंत गोरेगाव बिटाचे विस्ताराधिकारी कुमार खामकर, विद्यालयाचे प्राचार्य बि.आर. कांबळे, सर,गणित विज्ञान मंडळचे अध्यक्ष व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
         विकसित आणि आत्मनिर्भर भारत विषयावर आधारित हे विज्ञान प्रदर्शन बालवैज्ञानिकांमध्ये शोधक वृत्ती, सृजनशीलता, कल्पनाशक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक कौशल्य, सादरीकरण या गुणांना उत्तेजन देणारे आणि आत्मविश्वासाने स्पर्धात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे असे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबट मॅडम यांनी प्रास्ताविकात केले. गटविकास अधिकारी शुभदा पाटील  यांनी विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती, सजगता विकसित केली जावी आणि तंत्रज्ञानाबरोबरच संवेदना जपण्याचा मौलिक सल्ला दिला. नानासाहेब सावंत यांनी तंत्रज्ञानाचा अतिरेक व त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना दूर ठेवता आले पाहिजे असा संदेश दिला.
दुसऱ्या दिवशी पन्हळघर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ लोणेरे चे अध्यक्ष भाऊसाहेब सावंत बाल वैज्ञानिक व विज्ञान शिक्षकांशी संवाद साधला.  शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला कसे खत पाणी घालावे, विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं.  प्रदर्शनात इयत्ता सहावी ते आठवी या गटात ३६ तर इयत्ता नववी ते बारावी या गटात २७ , दिव्यांग विद्यार्थ्यांचे ३ प्रतिकृती, प्राथमिक शिक्षकांच्या ३,तर माध्यमिक ४ शिक्षकांनी सहभाग घेतला . या प्रतिकृती शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन या विषयांवर आधारित होत्या.
       संजय जाधव सर, संजय गवळी सर, अमित रेडीज सर, प्रदीप दिवेकर सर यांनी प्रतिकृतींचे परीक्षण केले. प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांनीही मुलांचं शिक्षण सोपं करणाऱ्या प्रतिकृती सादर केल्या.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments