Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसंघमित्राचा त्याग अविस्मरणीय 

संघमित्राचा त्याग अविस्मरणीय 

संघमित्राचा त्याग अविस्मरणीय 

         *संघमित्रा…… जिचा जन्म श्रीलंकेत झाला. जिनं विचार केला नसेल की आपलीही पुजा केली जाईल एखाद्या देशात. आपल्याही नावाचा एक दिवस असेल. परंतु म्हणतात की विधीचं विधान टळत नाही. मृत्यू हा सारस्वत सत्य असतो व तो टळत नाही. प्रत्यक्ष यमदूत येतो व यमदूत हा जीवंत असलेल्या व्यक्तीला घेवून जातो. परंतु त्याचं कार्य जीवंत राहातं. पैसा छीवंत नसतो त्याच्या जीवनातील. तेच घडलं संघमित्राबाबत व तिच्या जीवनाबाबत.*
           *संघमित्रा……. कोण होती संघमित्रा? काय केलं तिनं की तिला पुजलं जातं? असं काय घडलं तिच्या हातून की तिच्या नावानं एक दिवस पुजला जातो. संघमित्रा ही ती स्री की जिचा जन्म ऐश्वर्यसंपन्न अशा घराण्यात झाला. ती अशी स्री होती की जिला घरात काहीच कमी नव्हते. अन् तरीही तिनं असं महान कार्य केलं की जे कार्य आजही वाखाणण्याजोगंच आहे.*
         म्हणतात की आपल्याला मृत्यू येवू नये म्हणून दिवस वाढवले जातात. त्यासाठी व्रतवैकल्ये करण्याची भुमिका काही धर्म मांडतात. कोणी त्याला पुनर्जन्माचा आधार देतात. म्हणतात की पुनर्जन्मात पाप केले असेल तर ते या जन्मात भोगावेच लागते. आता पुनर्जन्म आहे किंवा नाही हे काही कोणी पाहायला गेलेला नाही. मृत्यू हा येणारच असतो. तो कोणाला वयोवृद्ध झाल्यानंतर येतो तर कोणाला अगदी ते बाळ एक वर्षाचा असतांना. ज्यानं नुकतंच जगात पाऊल ठेवलेलं असतं. परंतु मृत्यू जरी येत असला तरी आपल्याला आपले जीवन अजरामर करता येतं. त्यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे चांगले कर्म करुन व दुसरा प्रकार आहे वाईट कर्म करुन. चांगले कर्म करीत असणाऱ्या माणसाची झटपट प्रसिद्धी होत नाही. बराच वेळ लागतो. अन् तो जेव्हा प्रसिद्ध होतो. ती प्रसिद्धी काही लवकर नष्ट होत नाही. मात्र वाईट कर्म करणारा झटपट प्रसिद्ध होतो व तायाची दुर्गती होते. एखादाच व्यक्ती तेवढ्या प्रमाणात प्रसिद्ध होतो.
         आपल्याला माहीत आहे की मृत्यू हा कितीही व्रतवैकल्ये केली तरी येतोच. तो जसा यायचा तसा येतोच. ज्याप्रमाणे मृत्यू हा टाळल्या जावा म्हणून व्रतवैकल्ये असतात. त्याप्रमाणे पैसा वाढायला हवा म्हणून वैभवलक्ष्मीचे किंवा महालक्ष्मीचे व्रत केले जातात. ज्यात महालक्ष्मीचे व्रत करण्याचा काळ हा साधारणतः मार्गशीर्ष महिण्याचा असतो.
          मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे . या महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जातात. उद्देश असतो लक्ष्मी अर्थात पैसा प्राप्ती. आख्यायिका पसरवली आहे की या महिन्यात तशा स्वरुपाचे व्रत केल्याने पैसा हा केवळ टिकतच नाही तर वाढतो. त्यासाठी एक कथा सांगीतली जाते. जी शिला नावाच्या एका स्रीची कथा असते.
         ज्याप्रमाणे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला किंमत आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धम्मात ही याच महिन्याला महत्व आहे. बौद्ध धम्मात संघमित्रा नावाची सम्राट अशोकाची कन्या आपल्या तान्ह्यूल्या मुलाला घेवून याच दिवशी श्रीलंकेतील अनुराधापूरात गेली होती. केवळ धम्माचा उपदेश देण्यासाठी. पैसा कमवता यावा हे सांगण्यासाठी नाही. त्याचं कारण होतं, तेथील युवराज्ञीचं सम्राट अशोकाला पत्र लिहून बौद्ध भिक्षुणीची मागणी करणं. जिचं नाव अनुला होतं. त्याचं कारण होतं, महेंद्राचं श्रीलंकेत जाणं.
          म्हणतात सर्वात पहिलं बौद्ध संमेलन हे सम्राट अशोकांनी सांची येथे भरवलं. ज्यात अनेक मान्यवर व उपासक उपस्थित होते. ज्यात सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्रही उपस्थित होता. तो आपल्या पित्याची अवस्था व इच्छा पाहून श्रीलंकेला जाण्यास तयार झाला व तो जेव्हा श्रीलंकेला पोहोचला. तेव्हा तेथील राजा देवनामप्रिय तिस्स यांनी स्वागत केलं.
           श्रीलंकेत असतांना युवराज महेंद्रचा स्वभाव व त्याची तेजस्वी वाणी लोकांनी ऐकली व ते प्रभावीत झाले. त्यातच त्यांनं बौद्ध भिक्षु संघांची स्थापना केली. परंतु महिलांचाही बौद्ध संघ असावा. या च उद्देशानं लिहिलेली सम्राट अशोकाला चिठ्ठी व ती चिठ्ठी पाहताच त्या चिठ्ठीची चर्चा घरातच सम्राट अशोकांनी करताच त्यांची मुलगी संघमित्रा तयार झाली. परंतु सम्राट अशोकांनी नकार दर्शवला. म्हटलं तान्हुलं लेकरु. दुरचा प्रवास. ती व ते लेकरु कसं सहन करेल? मात्र निश्चेचा महामेरु न ढळू देता संघमित्रानं ते आव्हान स्विकारलं व ती श्रीलंकेत महिलांचा बौद्ध भिख्खू संघ स्थापन करण्यासाठी निघाली. ज्यात तिला सात दिवस लागले व जातांना तिनं सोबत बोधीवृक्षाचं लहानसं रोपटं नेलं.
          संघमित्रा श्रीलंकेत गेली व ती ज्या दिवशी श्रीलंकेत पोहोचली. तो दिवस होता त्यावेळचा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार. तेव्हापासून बौद्ध धम्मातही मार्गशीर्ष महिन्याला मानलं जातं.
         सध्याचा काळ म्हणजे पैशाकडे धावण्याचा काळ. या काळात केवळ पैशाला मान दिला जातो. दोन चांगल्या गोष्टी ऐकण्याला व करण्याला महत्व दिलं जात नाही. म्हणूनच या काळात महालक्ष्मी व्रताला महत्व आलेलं आहे आणि संघमित्रा दिवस कालबाह्य ठरलेला आहे. मात्र श्रीलंकेत आजही संघमित्रा दिवस म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार मानल्या जातो. संघमित्रानं भारतातून ज्या बोधीवृक्षाचं रोपटं श्रीलंकेत नेलं होतं व लावलं होतं. तो बोधीवृक्ष आजही तेथे अस्तित्वात असून त्याच लावलेल्या बोधीवृक्षाखाली लोकं गोळा होतात. त्यानंतर साधारणतः हा उत्सव तेथे महिनाभर चालतो.
         मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात महालक्ष्मी व्रत म्हणून तर बौद्ध धम्मात संघमित्रा दिवस म्हणून मानण्यात येतो. प्रत्येक धर्मानुसार त्या त्या गोष्टी व प्रथा परंपरा. मात्र काही लोकं आपल्या आपल्या प्रथेनुसार एकमेकांच्या धर्मावर आगपाखड करतात. त्वेषाचे बोल बोलतात. हे बरोबर नसून डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानात जी धर्मनिरपेक्षता दाखवली. ज्यातून सहिष्णुता व एकमेकांच्या धर्माबद्दल आदर. ही मुल्य दिसत नाही. जे दिसायला हवं ते दिसत नाही आणि जे दिसायला नको. ते दिसतं.
         धर्म हा कोणताही असो. तो धर्म वाद करणे शिकवीत नसून प्रत्येकच धर्म हा सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरीग्रह, ब्रम्हचर्य, या गोष्टींना महत्व देते. प्रत्येकच धर्म वादाला स्थान देत नाही. प्रत्येकच धर्म बळजबरीला स्थान देत नाही. तसेच प्रत्येकच धर्म हे एकमेकांच्या कुरघोडींना स्थान देत नाही. हे खरं असतांना आम्ही आज आपला धर्म वाढविण्यासाठी एकमेकांच्या धर्मावरलागपाखड करतो. आपला धर्म वाढायला हवा म्हणून बळजबरी करतो. अशानं धर्म काही काळच वाढतो. जेव्हापर्यंत शासन काळ असतो. शासनकाळ व हुकूमशाही संपली की आपोआपच वाढलेला धर्म हा कमी होतो. म्हणून धर्म जर वाढवायचा असेल तर असल्या हुकूमशाहीला थारा नाही. आजही श्रीलंकेत पुर्ण श्रीलंकाच बौद्धमय आहे. त्याचं कारण संघमित्रा व महेंद्र या भाऊ बहिणीने केलेला त्याग. बिचारी आपल्या तान्ह्युल्या बाळाची चिंता न करता पायपीट करुन श्रीलंकेच्या अनुराधापूरात गेली व तिनं बौद्ध धम्माचा प्रचार केला. तोही मनात किंतु परंतु न बाळगता.
         संघमित्रा ही श्रीलंकेत गेली व आयुष्यभर ती तेथेच राहिली. ती वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी मरण पावली. त्यातच तिचा भाऊ महेंद्र हा ऐंशीव्या वर्षी मरण पावला. आज बौद्ध धम्म टिकून आहे. तो महेंद्र व संघमित्रा सारख्या भावाबहिणींनी आपल्या ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्याग केल्यामुळेच. त्यांना त्यांच्या राज्यात काहीच कमी नसतांना केवळ बौद्ध धम्मावरील आस्था व त्यातील चांगले तत्व जगाला देण्याची भुमिका व प्रेरणा. त्या प्रेरणेला त्रिवार नमन करावंसं नक्कीच वाटतं. ज्याला त्याचं महत्व कळतं. कदाचीत ते दोघं भाऊबहिण श्रीलंकेत गेले ऑसते तर आज श्रीलंकेत बौद्ध धम्म नसता व मार्गशीर्ष महिन्यात संघमित्रा दिवस साजरा करायला कोणिच श्रीलंकेत वाली उरला नसता. हे तेवढंच खरं. संघमित्रा व महेंद्रनं आपल्या हयातीत धम्मप्रसाराचे चांगले कार्य करुन दाखवून दिलं की पैसा कमविण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शिकणे अती महत्वाचे आहे. मृत्यूनंतर चांगल्याच गोष्टी गोष्टी सोबतीला येत असतात. पैसा नाही. त्यांच्या घरी ऐश्वर्यसंपन्नता असूनही त्यांनी केलेलं चांगलं कार्य आज लोकांच्या स्मरणात आहे. जर त्यांनी तशा स्वरुपाचं कार्य केलं नसतं तर आज तेही जगाच्या नजरेतून ओझल झाले असते यात शंका नाही.
          महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं पैसे कमविण्यापेक्षा चांगलं कार्य करावं. जेणेकरुन आपलाही कोणी एखादा संघमित्रा दिवसासारखा एखादा दिवस साजरा करावा. आपलाही लौकिक व्बावा साऱ्या जगतात आणि आपणही श्रेष्ठ नव्हे तर पुजनीय ठरावे. आपण पुजनीय छरु. जर आपण आपले चांगले विचार संघमित्रा व महेंद्रसारखे जगाला देवू तर….. जसा त्यांनी केलेला त्याग आजही जगाला त्यांची आठवण करुन देतो. तथागत गौतम बुद्धांसारखा………
-अंकुश शिंगाडे नागपूर
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments